26 वर्षांच्या सरफराज खानकडे किती संपत्ती? 'या' आलिशान गाड्यांमधून फिरतो

Sarfaraz Khan Networth And Car Collection : टीम इंडियाचा युवा फलंदाज सरफराज खान याने बंगळुरूमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये खेळताना पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. टीम इंडिया संकटात असताना सरफराज खानच्या या शतकामुळे भारताला मोठी उभारी मिळाली. तेव्हा स्टार फलंदाज सरफराजचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्या एकूण नेटवर्थबद्दल जाणून घेऊयात. 

| Oct 19, 2024, 15:27 PM IST
1/6

सरफराज खानने बंगळुरू टेस्टच्या चौथ्या दिवशी 110 बॉलमध्ये शतक ठोकले. या दरम्यान त्याने 13 चौकार आणि 3 सिक्स लगावले. 71 व्या ओव्हरपर्यंत त्याने नाबाद 125 धावा केल्या. सरफराज खानने 2024 च्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सामन्यात भारताकडून पदार्पण केले होते.   

2/6

सरफराज खान एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी त्याने मोठा संघर्ष केला. सरफराज खानचे वडील नौसाद खान हे क्रिकेट कोच असून ते ट्रॅक पॅन्ट शिवण्याचा लहान व्यवसाय सुद्धा करतात असे सरफराजने एका मुलाखतीत सांगितले होते. नौसाद खान यांनी आपली दोन्ही मुलं सरफराज आणि मुशीर यांना क्रिकेटचं ट्रेनिंग दिलं.    

3/6

एका रिपोर्टनुसार 2024 पर्यंत सरफराज खानची एकूण संपत्ती ही $2 मिलियन इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये हे जवळपास 16.6 कोटी रुपये होतात. सरफराजची कमाई आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि जाहिरातींमधून होते. 

4/6

मुंबईत सरफराज आपल्या लहानपणीच्या घरी राहत असून त्याच कार कलेक्शन चांगलं आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये रेनॉल्ट डस्टर एसयूवी, एक ऑडी कर आणि आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या थारचा समावेश आहे. 

5/6

सरफराज खानने भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये 4 सामने खेळले असून यात एक शतक आणि 3 अर्धशतकासह त्याने 326 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने विविध संघांकडून खेळताना 50 सामने खेळले असून 585 धावा केल्या आहेत. 

6/6

सरफराज खानने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 51 सामने खेळताना 15 शतक आणि 14 अर्धशतकांसह 4422 धावा केल्या आहेत. तर List A च्या 37 सामन्यात त्याने 629 धावा केल्या आणि 2 शतक ठोकली आहेत.