IND vs ENG: T20 सीरिजमध्ये विक्रमासाठी विराट-रोहितमध्ये चुरस

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज अहमदाबादमध्ये होत आहे. संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सीरिजमध्ये भारतीय संघातील खेळाडूंचं नवे विक्रम करण्याचं लक्ष्य कायम असणार आहे. असे कोणते रेकॉर्ड होऊ शकतील जाणून घ्या सविस्तर

Mar 12, 2021, 10:10 AM IST
1/5

विराट कोहली

विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीच्या बाबतीत जगातील सर्व विक्रम मोडले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत टी -20 क्रिकेटमध्ये विराट 3000 धावा करणारा पहिला फलंदाज बनू शकतो. 85 टी -20 सामन्यात कोहलीने 2928 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 50.5 च्या सरासरीने फलंदाजी केली आहे.   

2/5

यजुवेंद्र चहल

यजुवेंद्र चहल

भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल टी -20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू बनू शकतो. चहलने 45 सामन्यांत 59 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहबरोबर संयुक्तपणे प्रथम स्थानावर आहे. बुमराह या मालिकेत खेळत नाही, अशा परिस्थितीत चहलला त्याला मागे सोडण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 

3/5

रोहित शर्मा

रोहित शर्मा

भारतीय संघाचा हिटमन रोहित शर्मा टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकू शकतो. रोहितच्या 107 सामन्यांत त्याने 127 षटकार ठोकले आहेत. जास्तीत जास्त षटकारांच्या बाबतीत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलच्या मागे आहे. गुप्टिलने 99 सामन्यात 139 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे या सीरिजमध्ये तो सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू होऊ शकतो. 

4/5

विराट कोहली-रोहित शर्मामध्ये चुरस

विराट कोहली-रोहित शर्मामध्ये चुरस

टी 20 क्रिकेट सामन्यांमध्ये अर्धशतक करण्यात विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्माने बरोबरी केली आहे. दोघांच्याही नावे 25-25 अर्धशतक आहेत. त्यामुळे यावेळी अर्धशतकी खेळीत कोण पुढे जाईल यासाठी चुरस असणार आहे.   

5/5

भुवीला संधी

भुवीला संधी

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारजवळ 50 विकेट्स पूर्ण कऱण्याची संधी या सीरिजनिमित्तानं चालून आली आहे. त्याने 43 सामन्यांमध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत. टी 20 सीरिजमध्ये 50 विकेट्स घेणार भुवनेश्वर कुमार चौथा गोलंदाज होऊ शकतो.