IND vs ENG: Debut Test Series 'या' खेळाडूनं मिळवला सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम

इंग्लंड विरुद्ध भारत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघानं 3-1नं विजय मिळवला आहे. 

Mar 07, 2021, 08:34 AM IST

इंग्लंड विरुद्ध भारत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघानं 3-1नं विजय मिळवला आहे. 

1/5

अक्षर पटेल

अक्षर पटेल

भारतीय स्पिनर अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्ध 13 फेब्रुवारी 2020 रोजी चेन्नई सामना खेळला होता. अक्षरने 4 सामन्यांच्या मालिकेत 3 कसोटीत भाग घेतला आणि एकूण 27 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरने 3 डावात 5 विकेट्स घेण्याचा त्यानं विक्रम केला आहे. कमी वयात कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स अक्षर पटेल हा खेळाडू आहे. त्याच्या या विक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

2/5

दिलीप दोषी

दिलीप दोषी

भारतीय संघाचे माजी क्रिकेटर दिलीप दोषी यांनी 11 सप्टेंबर 1979 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध  खेळताना पदार्पण केलं होतं.  6 कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांनी त्यावेळी 27 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी जरी अक्षर पटेल इतक्याच विकेट्स घेतल्या असल्या तरी दुप्पट कसोटी सामने खेळण्याचा त्यांचा अनुभव मात्र फार तगडा आहे.  

3/5

शिवलाल यादव

शिवलाल यादव

शिवलाल यादवने 19 सप्टेंबर1979 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यातून पदार्पण केलं होतं त्याने पहिल्या कसोटी मालिकेच्या 5 सामन्यात 24 बळी घेतले. त्याने भारताकडून खेळताना एकूण कसोटी सामन्यातील 102 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

4/5

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विनने 6 नोव्हेंबर 2011 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यातून पदार्पण केलं होतं. 3 कसोटी सामन्यांच्या सीरिजमध्ये त्याने एकूण 22 विकेट्स घेतल्या. आता एकूण क्रिकेटच्या त्याच्या कारकीर्दीमध्ये 400 हून अधिक बळी घेतले आहेत. (फोटो- बीसीसीआय)

5/5

एस व्यंकटराघवन

एस व्यंकटराघवन

भारतीय संघाचे माजी कर्णधार एस व्यंकटराघवन यांनी 27 फेब्रुवारी 1965 साली न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामन्यात डेब्यू केला होता. त्या 4 कसोटी सामन्यात एकूण त्यांनी 21 विकेट्स घेतले होते.