IND vs ENG: T20 Seriesसाठी टीम इंडियाची घोषणा, बुमराह, कुलदीप बाहेर

डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव, यष्टीरक्षक संजू सॅमसन आणि फलंदाज मनीष पांडे यांना संघातून वगळण्यात आलं आहे.

Feb 21, 2021, 13:56 PM IST
1/19

वरुण चक्रवर्ती

वरुण चक्रवर्ती

भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 5 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. वरून चक्रवर्तीला संघात संधी देण्यात आली आहे. त्याला 7 वेगवेदळ्या पद्धतीनं बॉलिंग करता येते. ऑफब्रेक, लेगब्रेक,  गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिन, पायाजवळील बोटांजवळ यॉर्कर असे काही प्रकार आहेत. IPL 2020 मधील त्याच्या कामगिरीमुळे त्याला संघात संधी देण्यात आली आहे. 

2/19

अक्षर पटेल

अक्षर पटेल

नुकताच अक्षर पटेलचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात त्याने प्रत्येकाची मने जिंकली. गेल्यावर्षीही अक्षरने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती.

3/19

वॉशिंगटन सुंदर

वॉशिंगटन सुंदर

अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदरचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. सुंदरच्या आताच्या कामगिरीप्रमाणेच पुढच्या सीरिजलाही उत्तम कामगिरी करेल अशी सर्वांची अपेक्षा आहे.

4/19

राहुल तेवतिया

राहुल तेवतिया

IPL 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा राहुल तेवतियाने 5 चेंडूत 5 षटकार ठोकत आपल्या संघाला किंग्ज इलेव्हन पंजाब (केएक्सआयपी) विरुद्ध रोमांचक विजय मिळवून दिला होता.

5/19

टी नटराजन

टी नटराजन

टी नटराजनने ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना आपल्या कामगिरीने वेड लावले.

6/19

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार

टीम इंडियामध्ये 1 महिन्यांनंतर भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन होत आहे. त्यामुळे आता इंग्लंडच्या संघाचे धावे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत. 

7/19

दीपक चाहर

दीपक चाहर

दीपक चाहरने 10 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेश विरूद्ध 7 धावा देऊन 6 बळी घेतले होते. टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा हा विश्वविक्रम आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी दीपकला संधी देण्यात आली आहे. 

8/19

नवदीप सैनी

नवदीप सैनी

नवदीप सैनीला ऑस्ट्रेलियामध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा इंग्लंडला तंबूत परत पाठवण्यासाठी नवदीपची तयारी सुरू आहे.

9/19

विराट कोहली (कर्णधार)

विराट कोहली (कर्णधार)

विराट कोहलीवर टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. विराटने ऑस्ट्रेलिया टी-20 सीरिज जिंकली होती. त्यामुळे आता इंग्लंड सीरिजही खिशात घालण्यासाठी योजना सुरू आहेत.       

10/19

रोहित शर्मा (उपकर्णधार)

रोहित शर्मा (उपकर्णधार)

दुखापतीमुळे हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया टी-20 सीरिज खेळू शकला नाही. पण आता कसोटीनंतर पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध टी-20 सीरिज खेळण्यासाठी तयार आहे.    

11/19

केएल राहुल

केएल राहुल

केएल राहुल (KL Rahul)  पुन्हा एकदा आपली चमकदार कामगिरी दाखवेल अशी आशा आहे.

12/19

शिखर धवन

शिखर धवन

टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन (Shikhar Dhawan)चं या सीरिजमध्ये शतक ठोकण्याचं लक्ष्य आहे. 

13/19

श्रेयष अय्यर

श्रेयष अय्यर

युवा गोलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आपल्या जुन्या चुका मागे सारुन आता पुन्हा नव्यानं सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

14/19

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव

बर्‍याच अपेक्षा आणि कठोर परिश्रमानंतर अखेर सूर्यकुमार यादवचा टीम इंडियामध्ये समावेश झाला. आयपीएल 2020 मध्ये त्याने शानदार फलंदाजी केली होती.

15/19

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या

ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 मालिकेत हार्दिक पांड्या मॅन ऑफ द सीरिज म्हणून निवडला गेला होता. आता पुन्हा एकदा त्याला ही संधी मिळाली आहे. 

16/19

ऋषभ पंत (विकेटकीपर)

ऋषभ पंत  (विकेटकीपर)

टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याक्षणी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्याच्या या कामगिरीचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो.

17/19

ईशान किशन (विकेटकीपर)

ईशान किशन (विकेटकीपर)

झारखंड संघाचा कर्णधार इशान किशनने शनिवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक झळकावले. ईशानने फक्त 94 चेंडूंत 133 धावांची शानदार खेळी केली आहे. या कामगिरीचे प्रतिफळ त्याला मिळाले.

18/19

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) मिळालेल्या संधीचं सोनं करेल ही अपेक्षा आहे. 

19/19

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया टी -20 सीरिजसारखाच पुन्हा एकदा इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये आपला परफॉर्मन्स देईल अशी आशा आहे.