आयपीएलच्या सांगता सोहळ्यात सलमान खान थिरकणार

May 22, 2018, 21:39 PM IST
1/5

Salman in Closing ceremony

Salman in Closing ceremony

आयपीएलच्या यंदाच्या सीझनचा सांगता सोहळा सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडीसच्या उपस्थितीमध्ये रंगणार आहे. 'रेस3'च्या प्रमोशनसाठी ही जोडी येणार आहे. 27 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर या सीझनचा अंतिम सामना रंगणार आहे. सलमान खान सोबत जॅकलीन, करिना कपूर, सोनम कपूर देखील हजेरी लावणार आहे. 

2/5

Salman Jacqueline Fernandez

Salman Jacqueline Fernandez

सलमान खान जेव्हा वेळ मिळतो तेव्हा पनवेलच्या फार्म हाऊसवर क्रिकेट खेळतो. `क्रिकेट फाइनल्स पार्टी तो बनती है`अशा एका खास कार्यक्रमाचंं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये सेलिब्रिटी खास हजेरी लावणार आहेत. (फोटो : Movie Poster)

3/5

Daisy Shah and iulia Vantur

Daisy Shah and iulia Vantur

सलमान खान त्याच्या आवडत्या टीम्स आणि खेळाडूंची नावंदेखील सांंगणार आहे. या  सोहळ्यात डेजी शहा,लुलिया वंतुरदेखील सहभागी होणार आहे. सोबत रवि दुबे, गौरव सरीन, आकृति शर्मा आणि देशना दुगद हे कलाकारदेखील उपस्थित राहणार आहेत.  

4/5

Race 3 Starcast

Race  3 Starcast

रेस 3 हा सिनेमा रेमो डिसुझा दिग्दर्शित आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान, जॅकलिन , बॉबी देओल, साकिब सलीम, अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. यंदाच्या ईदला म्हणजेच 15 जूनला रेस 3 रिलिज होणार आहे. (फोटो : Movie Poster)

5/5

Grand opening ceremony

Grand opening ceremony

आयपीएलच्या यंदाच्या ओपनिंंग सेरेमनीला ऋतिक रोशन,  प्रभु देवा, वरुण धवन, जैकलिन फर्नाडीज या कलाकारांंची उपस्थिती होती. या कलाकारांसोबत स्टेडियममधील प्रेक्षकही थिरकले होते.