जिओ युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, हे ४ रिचार्ज प्लान कंपनीने केले बंद

Jan 14, 2021, 13:28 PM IST
1/4

टेक साइट टेलिकॉमटॉकच्या माहितीनुसार, जिओने चार स्वस्त रिचार्ज प्लान बंद केले आहेत. कंपनीने अलीकडेच अमर्यादित कॉलिंग सुरू केल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, जिओफोन वापरकर्त्यांना केवळ जिओ नेटवर्कमध्ये विनामूल्य कॉल करता येत होते  

2/4

जिओने 99 रुपये, 153 रुपये, 297 आणि 594 रुपयांच्या प्लान बंद केला आहे.  

3/4

जिओने ग्राहकांसाठी 75, 125 रुपये, 155 आणि 185 रुपयांचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. सर्व चार रिचार्ज ऑल-इन-वन योजनेंतर्गत उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की जिओ युजक्स आता कोणत्याही नेटवर्कमध्ये अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात.

4/4

नवीन दरात इंटरनेट डेटा देखील दिला जात आहे. उदाहरणार्थ, 75 रुपयांच्या योजनेत, युजर्सला दररोज 0.1 जीबी डेटा मिळेल. 125 रुपयांच्या रिचार्ज योजनेत 0.5 जीबी डेटा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 155 रुपयांच्या योजनेमध्ये दररोज 1 जीबी डेटा उपलब्ध आहे. 188 रुपयांच्या रिचार्ज कूपनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. 153 रुपयांच्या रिचार्जवर 1.5 जीबी डेटा देण्यात आला आहे.