Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!

Rohit Sharma: आज भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने एक मोठं विधान केलं आहे. 

Surabhi Jagdish | Jun 27, 2024, 17:42 PM IST
1/7

भारत-इंग्लंड सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामना उशिरा सुरू होऊ शकतो. 

2/7

दरम्यान यावर रोहित शर्माने एक गमतीशीर गोष्ट म्हटली आहे.

3/7

रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, सेमीफायनलमध्ये मला केवळ फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटते की, जर सामना बराच काळ चालला तर माचे फ्लाइट चुकू शकतं.  

4/7

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, जर फ्लाइट चुकली तर आयसीसीच्या अडचणी वाढणार आहे. त्यामुळे आमचा भर सामना जिंकण्यावर आहे.

5/7

टीम इंडियाच्या सेमीफायनल मॅचमध्ये कोणताही राखीव दिवस नाही. मात्र या सामन्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.

6/7

आयसीसीच्या नियमांनुसार, जर दुसरा उपांत्य सामन्यात पावसाने खेळ केला तर टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये अव्वल राहिल्यामुळे अंतिम फेरीत पोहोचणार आहे.

7/7

मात्र बुधवारी टीम इंडियाच्या सरावादरम्यान गयानामधील हवामान स्वच्छ होते. विराट आणि इतर खेळाडूंनी जोरदार सराव केला.