केस पांढरे होण्यापासून कसे थांबवावे? पाहा सोपे उपाय

Hair care Tips : आजकाल तणावासोबत विविध समस्याही येतात. त्यापैकी एक केस पांढरे होणे. ताणतणाव, योग्य पोषण, योग्य व सकस आहार न घेणे, केसांना तेल न लावणे इत्यादी कारणांमुळे केस लवकर पांढरे पडू शकतात.

Jan 20, 2024, 17:30 PM IST
1/7

आवळा आणि जास्वंद

आवळा आणि जास्वंददेखील आपल्या केसांची देखभाल करू शकतात. यासाठी हे दोन्ही पदार्थ एकत्र करून त्याची एक पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळाशी साधारण 30 ते 45 मिनिटांसाठी लावून ठेवा.

2/7

मेहेंदी आणि कॉफी

मेहेंदीचा उपयोग आपल्या केसांसाठी होतो हे सगळ्यांना माहीत आहे. मात्र पांढरे केस कमी करण्यासाठी कॉफी आणि मेहेंदी पावडर एकत्र करून त्याचा एक हेअर मास्क बनवून घ्या. हा हेअर मास्क केसांवर 3 ते 4 तासांसाठी लावून ठेवा.

3/7

मेथी दाणे

भिजवलेल्या मेथी दाण्यांची एक बारीक अशी पेस्ट बनवून घ्या. त्या पेस्टमध्ये दुसरा कोणतीही पदार्थ न घालता सरळ केसांच्या मुळाशी ३० ते ४५ मिनिटांकरिता लावून ठेवा. त्यानंतर केस कोमट पाणी आणि एखादा सौम्य शम्पू वापरून घुवून घ्या.

4/7

एरंडेल आणि मोहरीचे तेल

एरंडेल आणि मोहरीचे तेल एकत्र करून त्याने तुमच्या केसांच्या मुळाशी मसाज करा. या दोन तेलांचे तयार मिश्रण केसांच्या मुळाशी ३० ते ४५ मिनिटांसाठी लावून ठेवावे.

5/7

कडीपत्ता हेअर मास्क

कडीपत्त्याची ताजी पाने घेऊन त्यांची एक पेस्ट बनवून घ्या. या पेस्टमध्ये खोबरेल तेल मिसळून सर्व लेप तुमच्या केसांवर ३० ते ४५ मिनिटांसाठी लावून ठेवावा. नंतर केस कोमट पाण्याने धुवून घ्या.

6/7

कोरा चहा

तुमच्या केसांच्या लांबीनुसार, कोरा चहा तयार करून घ्या. यासाठी पातेल्यात पाणी तापवून त्यामध्ये केवळ चहा पावडर घालून घ्या. तयार चहा गार झाल्यानंतर तो आपल्या संपूर्ण केसांना एक तासभर लावून ठेवा. नंतर केस धुवून टाका.

7/7

आवळा तेल

अंघोळीआधी खोबरेल तेलामध्ये आवळ्याचा अर्क एकत्र करून ते तेल केसांच्या मुळाशी लावून घ्या. हलक्या हाताने मुळांना मसाज करा. 30 ते 45 मिनिटांनंतर केस धुवून घ्या.