Tax Saving Tips: इन्कम टॅक्‍स वाचवण्यासाठी या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा, अजूनही वेळ गेलेली नाही

How To Save Tax In 2023: नवीन आर्थिक वर्ष आता सुरु होणार आहे. दरम्यान, या वित्तीय वर्षात इन्कम टॅक्स वाचवण्याचा विचार करत असाल तर 31 मार्च 2023 च्या आधी गुंतवणूक करा. जाणून घ्या कोणत्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही इन्कम टॅक्स वाचवू शकता.   

Mar 21, 2023, 21:21 PM IST
1/6

आयकर वाचवण्यासाठी पीपीएफ ही सर्वोत्तम सरकारी योजना आहे. तुम्ही PPF खात्यात 500 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सरकार पीपीएफमध्ये जमा केलेल्या पैशाची हमी देते. सध्या पीपीएफवर वार्षिक ७.१० टक्के व्याज मिळत आहे.  

2/6

१८ ते ६५ वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. NPS मध्ये गुंतवणूक करून, तुम्हाला 80C अंतर्गत 1.5 लाखाव्यतिरिक्त 50 हजारांची सूट मिळू शकते. यामध्ये तुम्ही 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.  

3/6

तुम्ही तुमच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडून कर वाचवू शकता. मोदी सरकारने सुरू केलेल्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 1.5 लाखांपर्यंतच्या सूटचा दावा करू शकता. यामध्ये सरकार ७.६ टक्के व्याज देते.  

4/6

पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते उघडता येते. तुम्ही येथे जमा केलेल्या 1.5 लाखांपर्यंतच्या रकमेवर 80C अंतर्गत आयकर सवलतीचा दावा करू शकता. त्यावर ७.४% वार्षिक व्याज मिळते.  

5/6

तुम्ही टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करूनही कर वाचवू शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक ५ वर्षांसाठी लॉक केली जाते. या प्रकारच्या FD चे व्याजदर वेळोवेळी बदलत राहतात. तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 80C अंतर्गत कर सूट मिळवू शकता.  

6/6

Equity Linked Savings Scheme (ELSS) हा एकमेव म्युच्युअल फंड आहे जो आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट देतो. ELSS मध्‍ये वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतचा नफा करपात्र नाही. ELSS चा किमान लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा असतो.