हिवाळ्यात फ्रीजमध्ये बर्फाचा डोंगर तयार झालाय? सोप्या ट्रीकने करा गायब

Remove Ice From Freezer: 

| Dec 11, 2023, 14:10 PM IST

Remove Ice From Freezer: फ्रीज आणि फ्रीजरमध्ये बर्फ तयार होण्याचे एक कारण म्हणजे ओलावा. ओलावा गरम हवेसह येतो

1/9

हिवाळ्यात फ्रीजमध्ये बर्फाचा डोंगर तयार झालाय? सोप्या ट्रीकने करा गायब

How To Remove Ice From Freezer simple trick Marathi News

Remove Ice From Freezer: आपल्या फ्रीजमध्ये हळहळू बर्फ गोठत जात असतो. बरेच दिवस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले की डोंगरासारखा थर तयार झालेला दिसतो. अनेक मार्गाने आपण हा थर काढण्याचा प्रयत्न करतो. पण तो इतका घट्ट झालेला असतो की धारधार सुरीने ठोकूनही निघत नाही. अशावेळी नेमकं काय करायचं? हे आपल्याला कळत नाही.

2/9

रेफ्रिजरेटरचे आयुष्य

How To Remove Ice From Freezer simple trick Marathi News

काही टिप्स आपण फॉलो केल्या तर बर्फाच्या थराची समस्या आपण चुटकीशीर सोडवू शकतो आणि रेफ्रिजरेटरचे आयुष्य आणखी वाढवू शकतो.

3/9

गरम हवेसह ओलावा

How To Remove Ice From Freezer simple trick Marathi News

फ्रीज आणि फ्रीजरमध्ये बर्फ तयार होण्याचे एक कारण म्हणजे ओलावा. ओलावा गरम हवेसह येतो, जी फ्रीज आणि फ्रीझरच्या आत असलेल्या थंड हवेत मिसळते आणि बर्फात बदलते. 

4/9

दरवाजे वारंवार उघडू नयेत

How To Remove Ice From Freezer simple trick Marathi News

म्हणून, फ्रीज आणि फ्रीजरमध्ये बर्फ तयार होण्यापासून रोखण्यासाठी आधी आर्द्रता आत येण्यापासून रोखली पाहिजे. याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रेफ्रिजरेटर आणि फ्रीझरचे दरवाजे वारंवार उघडू नयेत.

5/9

दार पूर्णपणे बंद

How To Remove Ice From Freezer simple trick Marathi News

फ्रीझरच्या दरवाजाचे रबर हवाबंद आहे का ते तपासून घ्या. फ्रिजचे दार पूर्णपणे बंद केले पाहिजे. यामुळे आतील थंड हवा बाहेर जाऊ शकत नाही. जर रबर सैल झाला असेल किंवा कुठेतरी फाटला असेल तर दरवाजा पूर्णपणे बंद होऊ शकणार नाही. यामुळे गरम हवा आत येईल आणि ओलावा निर्माण होईल. यामुळे बर्फ जलद गोठण्याची प्रक्रिया सुरु होईल.

6/9

फ्रीझरमधील हवा थंड

How To Remove Ice From Freezer simple trick Marathi News

फ्रीजरमध्ये बर्फ तयार होण्याचे एक कारण म्हणजे फ्रीजरचे कमी तापमान. फ्रीझरचे तापमान जसजसे कमी होते तसतसे फ्रीझरमधील हवा थंड होते. 

7/9

फ्रीझरचे तापमान

How To Remove Ice From Freezer simple trick Marathi News

त्यामुळे अन्नपदार्थांमधून ओलावा बाहेर येतो आणि फ्रीजरमध्ये गोठतो. म्हणून, फ्रीझरमध्ये बर्फ तयार होण्यापासून रोखण्यासाठी, फ्रीझरचे तापमान योग्य सेटिंगवर सेट केले आहे का याची खात्री करा. 

8/9

नियमितपणे स्वच्छ

How To Remove Ice From Freezer simple trick Marathi News

फ्रीझरमध्ये बर्फ साचल्यामुळे फ्रीझरच्या आतमध्ये हवेचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे फ्रीझरमधील हवा थंड होते आणि खाद्यपदार्थांमधून ओलावा बाहेर येतो आणि फ्रीझरच्या आत गोठतो. म्हणून, फ्रीझरमध्ये बर्फ तयार होऊ द्यायचा नसेल तर फ्रीझर नियमितपणे स्वच्छ आणि डीफ्रॉस्ट करा. 

9/9

बर्फ वितळण्यास सुरुवात

How To Remove Ice From Freezer simple trick Marathi News

फ्रीजर डीफ्रॉस्ट करताना प्रथम फ्रीजरमधून सर्व अन्न काढून टाका. अन्न बाहेर काढल्यानंतर फ्रीझर पूर्णपणे बंद करा. फ्रीझर बंद केल्याने फ्रीजरमधील बर्फ वितळण्यास सुरुवात होईल. एका तासानंतर, आपण फ्रीजर उघडू शकता आणि बर्फ साफ करू शकता.