काळे पडलेले गुडघे, घोटे 10 मिनिटात चमकतील, करा 'हा' घरगुती उपाय

Skin Care Tips:जास्त सूर्यप्रकाशामुळे आणि हार्मोनल असंतुलनामुळे कोपर आणि गुडघे काळे होतात. यासाठी जास्त खर्च न करता घरच्या घरी ही समस्या दूर करता येऊ शकते. काळपटपणा दूर करण्यासाठी आयुर्वेदात उपाय सांगण्यात आले आहेत. ते जाणून घेऊया. 

| Aug 31, 2023, 18:16 PM IST

Skin Care Tips:जास्त सूर्यप्रकाशामुळे आणि हार्मोनल असंतुलनामुळे कोपर आणि गुडघे काळे होतात. यासाठी जास्त खर्च न करता घरच्या घरी ही समस्या दूर करता येऊ शकते. काळपटपणा दूर करण्यासाठी आयुर्वेदात उपाय सांगण्यात आले आहेत. ते जाणून घेऊया. 

1/8

काळे पडलेले कोपर, गुडघे 10 मिनिटात चमकतील, करा 'हा' घरगुती उपाय

How to Remove blackness of elbows and knees with home remedies

जास्त सूर्यप्रकाशामुळे आणि हार्मोनल असंतुलनामुळे कोपर आणि गुडघे काळे होतात. यासाठी जास्त खर्च न करता घरच्या घरी ही समस्या दूर करता येऊ शकते. काळपटपणा दूर करण्यासाठी आयुर्वेदात उपाय सांगण्यात आले आहेत. ते जाणून घेऊया. 

2/8

काकडी

How to Remove blackness of elbows and knees with home remedies

काकडीचे तुकडे करा आणि कोपर आणि गुडघ्यांवर 15 मिनिटे चोळा. नंतर पाच मिनिटे राहू द्या. थंड पाण्याने धुवा. रोज केल्यास कोपराचा काळेपणा दूर होतो.

3/8

लिंबू आणि बेकिंग सोडा

How to Remove blackness of elbows and knees with home remedies

लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट्ससोबतच व्हिटॅमिन सी देखील असते. ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. बेकिंग सोडा त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी 'क्लींजर' प्रमाणे काम करतो. यासाठी लिंबूचे दोन तुकडे करा आणि त्यावर एक चमचा बेकिंग सोडा शिंपडा. कोपर आणि गुडघ्यांना एक मिनिट चोळा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.

4/8

दूध आणि कोरफड

How to Remove blackness of elbows and knees with home remedies

कोरफड मध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. दूध आणि कोरफडीचे मिश्रण तयार करून त्वचेवर रात्रभर लावा. सकाळी धुवा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सुधारेल.

5/8

बटाटा

How to Remove blackness of elbows and knees with home remedies

बटाट्याचा रस रोज लावल्याने काळपटपणा दूर होतो. तसेच त्वचा मुलायम बनते. बटाटा किसून त्याचा रस त्वचेवर लावा. 15 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा. यानंतर मॉइश्चरायझर लावा.

6/8

हळद

How to Remove blackness of elbows and knees with home remedies

एक चमचा दुधात थोडी हळद मिसळा. गुडघे आणि कोपरांवर लावा. थोडा वेळ मसाज केल्यानंतर, कोरडे होऊ द्या. कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही मिश्रणात थोडे मध देखील घालू शकता.

7/8

खोबरेल तेल

How to Remove blackness of elbows and knees with home remedies

आंघोळीनंतर खोबरेल तेल लावा. दोन-तीन मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यानंतर, त्वचेला तेल शोषले जावे म्हणून सोडा.

8/8

मध

How to Remove blackness of elbows and knees with home remedies

मध त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. दोन चमचे मधामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. ते मृत त्वचेवर लावा. 20-30 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.