PHOTO: विमातळावर बॅग हरवली? नो टेन्शन! 'अशा' पद्धतीने बॅग परत मिळवा

Air Travelling Tips: विमान प्रवास करतााना आपलं सामान कसं ओळखावं आणि सामान हरवू नये यासाठी काय काळजी घ्यावी ते पाहूया. पहिल्यांदा विमान प्रवास करतााना बऱ्याचदा एअरपोर्टवर सामान हरवतं. विमानतळावर चेकींग करताना रोज प्रवास करणाऱ्यांच्या बॅगेतील देखील बरचसं सामान हरवतं. त्यामुळे विमान प्रवास करताना अनेकांना आपल्या सामानाची चिंता असते.      

Jul 11, 2024, 16:32 PM IST
1/7

कामानिमित्त आणि बाहेर फिरायला जाण्यासाठी विमानाने प्रवास करायला अनेकांना सोयीचं वाटतं. मात्र जर तुम्ही पहिल्यांदा विमान प्रवास करत असाल किंवा रोजच्या विमान प्रवासात तुमचं सामान हरवत असेल, तर या सोप्या ट्रिक वापरुन तुम्ही तुमच्या सामानाची योग्य काळजी घेऊ शकता.

2/7

विमान तळावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची चेकींग करणं महत्त्वाचं आहे. पण बऱ्याचदा या सगळ्याची योग्य माहिती नसल्यामुळे सामान एअरपोर्टवर हरवतं. 

3/7

कॅरोसेलवरुन सामान चेकींग करुन येताना प्रवाशांच्या बॅग्ज सारख्या दिसतात .त्यामुळे बऱ्यादा आपली बॅग कोणती हे ओळखणं कठीण होतं. 

4/7

विमानाने प्रवास करताना आपली बॅग ओळखता यावी, यासाठी काहीतरी खूण करुन ठेवा. त्यामुळे बॅग ओळखण्यात आपला वेळ वाया जात नाही.   

5/7

तुमच्या बॅगेवर तुम्ही तुमच्या आवडीची एखादी खूण करु शकता. जसं की, एखादा फोटो किंवा कसलंही स्टिकर बॅगेला लावणं किंवा मग एखादी रिबीन तुमच्या बॅगेला तुम्ही बांधू शकता. जेणे करुन तुम्हाला तुमची बॅग ओळखणं सोपं जाईल.

6/7

प्रवासात सामान शक्यतो कमीच ठेवा त्यामुळे सामानाचा गोंधळ उडणार नाही.   

7/7

फक्त विमानानेच नाही तर कोणत्याही वाहनाने प्रवास करताना तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. शक्य असल्यास तुमच्या किंमती वस्तूंचा इन्शुरन्स (विमा) काढलेलं तुमच्या सेफ्टीसाठी चांगलं असतं.