Indian Railway : हे इंजिन कसलं आहे मालगाडी की प्रवासी, तुम्हाला माहितीये का फरक?

Railway Train Engine: आपण कोणतीही ट्रेन पाहिली की आपल्याला प्रश्न असतो की ही नक्की एक्सप्रेस आहे की नक्की मालगाडी? पण आता तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे. इंजिनवर लिहिलेल्या काही शब्दांच्या मदतीनं आपण लगेच ओळखू शकतो की ते नक्की पॅसेंजर ट्रेनचे इंजिन आहे की मालगाडीचे इंजिन. इंजिन ज्या प्रकारे बनवण्यात येते त्यावर असते. त्यावरून ठरवलं जातं की इंजिन हे एकूण किती वजन घेऊन जातं. चला तर जाणून घेऊया त्याविषयी...

Feb 05, 2023, 18:43 PM IST
1/5

Indian Railway engine

भारतीय रेल्वे सेवा ही जगातील काही नावाजलेली रेल्वे सेवांपैकी एक आहे. भारतातील अनेक लोकांना भारतीय रेल्वेबद्दल काही गोष्टी माहिती नाही. आज आपण अशीच एक माहिती जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे ते प्रवासी गाडीचे इंजिन की मालगाडीचे.  

2/5

Indian Railway engine

भारतीय रेल्वेच्या इंजिनमध्ये काही अक्षरे लिहिलेली असतात. यामध्ये WAG, WAP, WDM, WAM अशी अक्षरे लिहिली जातात. यावरून ठरवलं जातं की हे इंजिन किती वजन घेऊन जाऊ शकतं. 'W' म्हणजे पाच फूट असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या गेजशी संबंध आहे. 'A' म्हणजे पॉवरचा स्त्रोत म्हणजे वीज आणि जर 'D' असेल तर त्याचा अर्थ ही ट्रेन डिझेलवर चालते.  

3/5

Indian Railway engine

P म्हणजे पॅसेंजर ट्रेन, G म्हणजे गुड्स ट्रेन, M म्हणजे मिक्स कामांसाठी आणि S म्हणजे 'शंटिंग'. या अक्षरांच्या आधारे हे इंजिन कोणत्या प्रकारचे आहे हे कळू शकते.  

4/5

Indian Railway engine

WAG, WAP आणि WAM चा अर्थ काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. WAG म्हणजे इंजिन रन्स ऑन वाइड गेज ट्रॅक आणि हे एक AC मोटिव्ह पॉवर इंजिन आहे, ज्याचा वापर मालगाडीसाठी केला जातो.

5/5

Indian Railway engine

WAP म्हणजे ते एसी पॉवरवर चालते आणि प्रवासी गाड्यांसाठी वापरले जाते. WAM म्हणजे एसी मोटिव्ह पॉवर इंजिन, पण हे मिक्स कामांसाठी वापरले जाते तर हे इंजिन प्रवासी आणि मालगाडी दोन्ही घेऊन जाण्यासाठी वापरले जाते. WAS म्हणजे ते शंटिंगच्या उद्देशाने वापरले जातात.