Fashion Tips: उंच दिसण्यासाठी हिल्स घालण्याची गरजच नाही...'या' ड्रेसिंग टिप्स एकदा नक्की ट्राय करा

(how to look taller tips )मुळात उंचीवरून न्यूनगंड बाळगणं सोडून द्या,  हे महत्वाचं. आणि उंच दिसण्यासाठी हाय हिल्स घालाव्या लागतात हा गैसमजसुद्धा काढून टाका कारण अगदी बेसिक ड्रेसिंग सेन्सही (dressing tips to look beautiful) तुम्हाला चारचौघात उठून दिसण्यास पुरेसा असतो . 

Jan 05, 2023, 09:31 AM IST

(fashion tips) आपला सगळा लुक पूर्ण करण्यासाठी शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे फूटवेअर. मुलींकडे सगळ्या ड्रेसला मॅचिंग असं फूटवेअरचं कलेक्शन (footwear collection) असतं. चप्पल, बूट्स, हिल्स, अश्या अनेक प्रकारचे फूटवेअर  बाजारात उपलब्ध आहेत. कमी उंचीच्या महिला मुख्यतः उंच दिसण्यासाठी हिल्स घालताना दिसतात,  (how to look tall) तात्पुरत्या काळासाठी तुम्ही उंच दिसता पण हिल्स घातल्याने शरीरावर त्याचा परिणाम होतो. चला मग आज जाणून घेऊया, उंच दिसण्यासाठी हिल्स न घालता काय करू शकतो स्मार्ट टिप्स . 

 

1/5

कमी उंची आणि वजन थोडं जास्त असेल तर तुम्ही काळया रंगला प्राधान्य द्या. शिवाय डार्क ब्लु, मरून, किंवा कोणत्याही डार्क रंगाचा वापर करा.  याने तुम्ही उठून आणि सुंदर दिसाल. 

2/5

उंच दिसण्यासाठी, फुल स्लिव्हसचे  कपडे घालण्यावर भर द्या. पफ स्लिव्हस, बलून स्लिव्हस घालणं  आवर्जून टाळा.

3/5

बटबटीत डिझाइन्स किंवा आडव्या पट्ट्या असलेले ड्रेस घालू नका याने उंची कमी दिसते.

4/5

उंच दिसण्यासाठी बारीक प्रिंट आणि सरळ लाईन्स असतील अश्या ड्रेसची निवड करा. 

5/5

उंच दिसण्यासाठी कपड्यांची लांबीकडे लक्ष द्या. उंची कमी असेल तर कुर्त्याची लांबी गुढघ्यापासून थोडी खाली असावी. जर कुर्ता गुढघ्याच्या वर असेल तर उंची आणखी कमी दिसून येईल