तुम्हाला कोणी व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलंय? जाणून घ्या कसं शोधायच ते...

तुम्हाला कोणी खरचं ब्लॉक करण्यात आलं आहे की नाही हे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरद्वारेच कळू शकतं. तुम्ही या चार पद्धतीने शोधू शकता.

Jul 12, 2022, 16:24 PM IST

WhatsApp Tips And Tricks : मित्रांशी गप्पा मारण्यापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत सर्वच ठिकाणी वापरलं जातं. अशा वेळी जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याला मेसेज केला पण त्याच्यापर्यंत तो पोहोचला नाही किंवा जर कॉलही लागत नसेल, तर कदाचित तुम्हाला ब्लॉक केलं आहे अस सिद्ध होतं. (WhatsApp ब्लॉक). 

1/5

लास्ट सीन/ऑनलाइन स्टेटस

सर्वात सोपा मार्ग म्हणजे चॅट विंडोमध्ये लास्ट सीन/ऑनलाइन स्टेटस पाहणे. ब्लॉक केल्यानंतर, व्यक्तीचे लास्ट सीन, ऑनलाइन स्टेटस आणि फोटो दिसणं बंद होत. यू़जर्सकडे लास्ट सीन/ऑनलाइन स्टेटस आणि फोटो हाईड करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही दुसरा पर्याय वापरु शकता.

2/5

मेसेजिंगवर ब्लू टिक

मेसेज केल्यावर ब्लू टिक दिसल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीने मेसेज वाचला आहे. जर डबल टिक देखील दिसत असेल तर समजा मेसेज पोहोचला आहे परंतु यूजर्सने तो वाचला नाही. कधी कधी हे ब्लू टिक बंद केलेलंही असू शकतं. पण एकच टिक आली तर समजून घ्या की त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे.

3/5

व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करताना वारंवार येणाऱ्या अडचणी

मेसेज व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅपवर बहुतेक व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल केले जातात. कॉल केल्यानंतर रिंग वाजली असे लिहिलं असेल तर समजावं की कॉल त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे. पण जर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असेल तर कॉल पुन्हा पुन्हा फेल होईल. पण काही वेळा नेटवर्कच्या समस्येमुळे कॉल रिसिव्ह होत नाही. तर अशा वेळी तुम्ही चौथा पर्याय वापरु शकता.

4/5

WhatsApp वर ग्रुप तयार करा

ग्रुप तयार केल्याने तुम्हाला समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे की नाही हे सहज समजेल. व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार केल्यानंतर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीला अॅड करावं लागेल.

5/5

जर ADD ग्रुपमध्ये नसेल तर तुम्ही ब्लॉक केले गेले आहात

ग्रुपमध्ये ADD करताना जर 'Couldn't Add This Contact On Group' असा मेसेज दिसला, तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला ब्लॉक आहे.