House Rent Allowance : स्वतः च्या घरी राहात असताना House Rent Allowance साठी कसा क्लेम कराल? जाणून घ्या
House Rent Allowance: नोकरी केली तर घरभाडे भत्ता नक्कीच मिळतो. हा पगाराचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कर वाचण्यास मदत होते. मात्र, त्यासाठी भाडे भरणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल तर घरभाडे भत्त्याचा लाभ कसा मिळवायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
1/5
तुम्ही नोकरी करत असाल तर घरभाडे भत्ता हा पगारात मिळतो. कर वाचवण्यासाठी हा भत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, घरभाडे भत्त्याबाबत मर्यादा असून काही महत्त्वाच्या अटीही आहेत. आयकर कायद्याच्या कलम 10 (13A) अंतर्गत HRA वर कर लाभ उपलब्ध आहे. एचआरए कर सवलतीच्या कक्षेत येतो. ग्रॉस टॅक्सेबल इनकमची गणना करण्यापूर्वी हा भाग तुमच्या एकूण उत्पन्नातून वजा केला जातो.
2/5
3/5
4/5
कर तज्ज्ञांच्या मते, जर घर तुमचे आई-वडिल किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाच्या नावावर असेल तर टॅक्समध्ये सूट मिळेल. कर लाभ घेण्यासाठी तुम्हाला पालकांना भाडे द्यावे लागेल. यासाठी भाडे करार आणि भाडे पावती आवश्यक असेल. मात्र, एकूण भाड्याची रक्कम पालकांचे उत्पन्न म्हणून दाखवावी लागेल.भाड्याची रक्कम त्यांच्या एकूण उत्पन्नात जोडली जाईल आणि त्यावर त्याला कर भरावा लागेल. जर त्यांच्याकडे कोणतेही उत्पन्न नसेल तर हे देखील त्यांच्यासाठी उत्पन्नाचे साधन असेल. अशा प्रकारे दुहेरी फायदा होऊ शकतो. घर करदात्याच्या नावावर नसावे, अशी अट आहे.
5/5