'असा' निवडा फाउंडेशन बेस; मेकअप करताना चेहरा अजिबात तेलकट, काळपट दिसणार नाही

सौंदर्य प्रत्येकालाच प्रिय असतं. सणावाराला आणि समारंभाला मेकअप केला करणं सगळेच पसंत करतात पण बऱ्याचदा हा मेकअप फुटतो किंवा चेहरा काळा पडतो. याचं कारण म्हणजे चुकीचा फाउंडेशन बेस वापरणं. त्वचेचा प्रकार ओळखून मेकअपसाठी फाउंडेशन कसं वापरावं ते जाणून घेऊयात. 

Mar 25, 2024, 18:12 PM IST

रंगाप्रमाणेच त्वचेचे तीन प्रकार पडतात. कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि मिश्र म्हणजेच (dry, oily, And combination)या तीन प्रकारानुसार मेकअपसाठी फाउंडेशन वापरलं तर मेकअप खराब होत नाही. 

1/6

त्वचेचा प्रकार कसा ओळखावा ?

सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सिबम ऑईल सुटतं. टीशू पेपरने चेहऱ्यावर हलकसं टॅप करून तो उन्हात घेऊन जायचा. त्यानंतर जर टीशू पेपरवर सिबम ऑईलचे डाग जास्त दिसले तर तुमची तेलकट त्वचा आहे असं समजावं.

2/6

तसंच जर  सिबम ऑईलचे डाग जास्त नसतील तर तुमची मिश्र  त्वचा असू शकते. जर टीशू पेपरवर खुपच कमी म्हणजे सिबम ऑईलचे स्पॉटींग दिसत असतील तर तुमची कोरडी त्वचा असू शकते.   

3/6

तेलकट त्वचा

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही मेकअपसाठी पावडर बेस किंवा ऑइल-फ्री लिक्विड बेस फाउंडेशन वापरु शकता. याचा फायदा म्हणजे यामध्ये असलेला  ग्रॅन्युल नावाचा घटक चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेतो. त्यामुळे मेकअप केल्यावर चेहरा तेलकट दिसत नाही. 

4/6

कोरडी त्वचा

कोरड्या त्वचेवर सुरकुत्या खूप जास्त असतात.ज्यांची त्वचा कोरडी असते ते डल स्कीनमुळे वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतात. फाईन लाईन किंवा सुरकुत्या येऊ नये याककरीता मॉइश्चरायझर वापरणं फायदेशीर ठरतं. 

5/6

तसंच मेकअचा फाउंडेशन बेस हा लिक्विड फाउंडेशन किंवा स्टिक फाउंडेशन  असावा. यातील क्रीम बेसमुळे स्कीन हायड्रेट  राहते.   

6/6

मिश्र त्वचा

कोरडेपणा आणि तेलकटपणा यांचं कॉम्बिनेशन या स्कीन प्रकाराच दिसून येतं. या स्कीन प्रकारातील व्यक्तींना क्रीमी बेस फाउंडेशन सूट करतं.  ही स्कीन दोन्हींच  कॉम्बिनेशन असली तरी तेवढीच ती  संवेदनशील ही असते. त्यामुळे मेकअपसाठी कोणताही फाउंडेशन बेस निवडताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.