Income Tax ची Notice कोणाला पाठवली जाते? 'या' चूका केल्यास तुमच्यावरही पडू शकते धाड

Income Tax Notice: अमुक एका नेत्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली. तमूक एका अधिकाऱ्यावर इन्कम टॅक्सने छापा मारला यासारख्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पहिल्या असतील. मात्र इन्कम टॅक्स विभागाची कारवाई अशीच सहज केली जात नाही. अनेकदा लोकांनी केलेल्या चुकांमुळेच अशी नोटीस येते. या चुका कोणत्या ते जाणून घेऊयात...  

Feb 23, 2023, 19:20 PM IST
1/7

income tax department notice

how to avoid income tax department notice : इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना करदात्यांनी आपल्या कमाईबद्दल योग्य माहिती देणं अपेक्षित असतं. मात्र काही चूकांमुळे करदाते इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर येतात. सामान्यपणे या चूका 5 प्रकारच्या असतात. यापैकी एखादी जरी चूक झाली तर इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. या 5 चूका खालील प्रमाणे - 

2/7

income tax department notice

आयकर रिटर्न्स फॉर्म भरताना त्यामध्ये चुकीची माहिती दिली तर इन्कम टॅक्स विभाग नोटीस पाठवतो. यामध्ये दोन प्रकारचे तपासणी केली जाते. पहिली मॅन्यूअल तर दुसरी कम्पल्सरी. पहिल्या प्रोसेसमध्ये काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास इन्कम टॅक्स भरणं टाळता येतं. मात्र दुसऱ्या प्रकारामध्ये फॉर्ममध्ये काही गडबड केली असेल तर ते पकडलं जातं.  

3/7

income tax department notice

अनेकदा इन्कम टॅक्स रिटर्नस न भरल्याने विभागाकडून नोटीस पाठवली जाते. तुमची कमाई ही आयकर मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आयकर भरणं फार आवश्यक असतं. तुम्ही भारताचे नागरिक नसाल आणि तुमच्याकडे परदेशात काही संपत्ती असेल तर तुम्हाला आयकर भरणं आवश्यक आहे.

4/7

income tax department notice

तुम्ही भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न्समधील टीडीएस आणि एकूण कमाईमधील कराच्या रक्कमेमध्ये तफावत असेल तर तुम्हाला नोटीस येऊ शकते. किती टीडीएस कापण्यात आला होता हे लक्षात घेऊन त्यानंतरच त्याचा रिटर्न्समध्ये समावेश करावा.

5/7

income tax department notice

तुम्ही कोणत्याही आर्थिक वर्षामध्ये केलेली कमाई ही आरटीआयमध्ये नमूद हवी. अनेकदा लोक खात्यांवरील, एफडी आणि रिकरिंग डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजाची माहिती आयटीआरमध्ये देत नाही.

6/7

income tax department notice

काही लोक आयटीआर रिटर्नमध्ये चूक करतात आणि महत्त्वाची माहिती भरत नाही. असं झाल्यास इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस येऊ शकते. त्यामुळे तज्ञांकडूनच आयटीआर भरुन घ्यावा.

7/7

income tax department notice

तुमच्या खात्यावरुन एखादा मोठा व्यवहार झाला असेल किंवा अधिक रोख रक्कम जमा झाली असेल तर तुम्हाला इन्मक टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते. उदाहरण घ्यायचं झालं तर वार्षिक 5 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीने खात्यावर 12 लाख रुपये भरल्यास अशा व्यक्तीला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.