हिंदुकुश पर्वत अंतराळातून कसं दिसतं? आंतराळवीरने शेअर केले फोटो

आंतराळवीरने हिंदुकुश पर्वताचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

Feb 05, 2024, 22:51 PM IST

Hindu Kush Mountain : पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. अनेक देशांचे आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन येथे करत आहेत.  येथे कार्यरत असलेले आंतराळवीर अनेकदा स्पेस स्टेशनवरुन पृथ्वीचे सुंदर नजारे सोशल मिडियावर शेअर करत असतात. आता हिंदुकुश पर्वताचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 

1/7

हिमालय पर्वत रांगेतच हिंदुकुश पर्वत दडलेला आहे. हिंदुकुश पर्वत अंतराळातून खूपच सुंदर दिसतो. 

2/7

'तिरिक मिर' हे  7708 मीटर उंचीच्या हिंदुकुश पर्वतरांगेतले सर्वोच्च शिखर आहे.  हे शिखर पाकिस्तानातल्या खैबर-पख्तूनख्वा भागातील चित्रल परिसरात आहे.  

3/7

हिंदुकुश, ही मध्य अफगाणिस्तान आणि उत्तर पाकिस्तान यांदरम्यान पसरलेली सुंदर पर्वतरांग आहे. 

4/7

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेत  हिंदुकुश पर्वतावर प्रकाश पर्वर्तित होतो आणि बर्फाळ डोंगर चमकताना दिसतो.   

5/7

 सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये  हिंदुकुश पर्वत चमकताना दिसत आहे. वैज्ञानिक भाषेत याला एल्पेनग्लो असे म्हणतात.   

6/7

इंटरनेशनल स्पेस स्टेशनवर कार्यरत असलेल्या आंतराळवीर लोरल ओहारा (Loral O'Hara) यांनी   हिंदुकुश पर्वताचे अभूतपूर्व  फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

7/7

थेट इंटरनेशनल स्पेस स्टेशनवरुन या हिंदुकुश पर्वताचे सुंदर फोटो कॅप्चर करण्यात आले आहेत.