Sex Life Tips: महिन्यातून किती वेळा सेक्स करावा? जाणून घ्या तुमच्या वयानुसार...

लैंगिक जीवनाबाबत (Sex Life Tips) प्रत्येकाच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. सेक्स करणं चुकीचं की बरोबर? सेक्स (Physical RelationShip) करण्यासाठी योग्य वय काय? सेक्स किती वेळा करावा? अशा प्रश्नांचं घर प्रत्येकाच्या मनात असतं. याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेकजण करतात.

May 17, 2023, 00:18 AM IST

Sex life tips in Marathi: लैंगिक जीवनाबाबत (Sex Life Tips) प्रत्येकाच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. सेक्स करणं चुकीचं की बरोबर? सेक्स (Physical RelationShip) करण्यासाठी योग्य वय काय? सेक्स किती वेळा करावा? अशा प्रश्नांचं घर प्रत्येकाच्या मनात असतं. याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेकजण करतात.

1/5

किन्से इन्स्टिट्यूटने याबाबतचा अहवाल जारी केला आहे. या अहवालात वेगवेगळ्या वयोगटानुसार योग्य आकडा जाहीर करण्यात आलाय. यामध्ये 18-29, 30-39, 40-50 आणि 50 वरील वयोगटातील अभ्यासाचा समावेश आहे.

2/5

18 ते 29

18 ते 29 या वयोगटातील एक व्यक्ती वर्षातून सरासरी 111 वेळा सेक्स करते. त्यानुसार तो महिन्यातून 8 वेळा आणि आठवड्यातून दोनदा सेक्स करतो. या वयोगटात सेक्स करणं आरोग्य आणि मन दोन्हीसाठी फायद्याचं ठरतं

3/5

30 ते 39

समोर आलेल्या संशोधनानुसार, 30 ते 39 या वयोगटातील व्यक्ती वर्षातून सरासरी 86 वेळा सेक्स करतो. सेक्ससाठी वेळ न मिळाल्याने लोक सेक्स कमी करतात, असं या अहवालात समोर आलंय.

4/5

40 ते 50

रिपोर्टच्या अभ्यासानुसार, 40 ते 50 या वयोगटातील व्यक्ती एका वर्षात सरासरी 69 वेळा सेक्स करते. जीवनात सकारात्मकता जाणवण्यासाठी या वयोगटात सेक्स केला जातो, असंही संशोधनात समोर आलंय.

5/5

50 वरील वयोगट

दरम्यान, 50 वरील वयोगटातील बहुतेक लोक लैंगिक संबंधात सक्रिय राहत नाही. मात्र, पाश्चिमात्य देशात बहुतेक लोक लैंगिक संबंधात सक्रिय राहतात, असंही दिसून आलंय.