एनसीबीत असताना Sameer Wankhede यांना किती पगार मिळत होता?

Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीबीआयने नुकताच समीर वानखेडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी वानखेडेने शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. मात्र सीबीआयच्या अहवालात वानखेडे यांच्या संपत्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

May 19, 2023, 18:34 PM IST
1/7

Sameer Wankhede Aryan khan

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करणारे समीर वानखेडे यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता नव्या माहितीनुसार, वानखेडे यांनी कुटुंबासह अनेक परदेश दौरे केल्याचे समोर आले आहे.

2/7

Sameer Wankhede NCB

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी समीर वानखेडे यांना सहा महिन्यांसाठी एनसीबीच्या विभागीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढवण्यात आला होता.  31 डिसेंबर 2021 रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. 

3/7

Sameer Wankhede salary

एनसीबीच्या अतिरिक्त आयुक्त पदासाठी श्रेणीनुसार 37 हजार 400 ते 67 हजार इतका पगार मिळतो. तसेच श्रेणीनुसार त्यांना विविध भत्तेसुद्धा मिळतात. या भत्त्यांनुसार अतिरिक्त आयुक्त पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार हा 1 लाख 23 हजार ते 2 लाख 15 हजार इतका असू शकतो.

4/7

Sameer Wankhede tour

धक्कादायक बाब म्हणजे, सीबीआयच्या अहवालात 2017 ते 2021 या पाच वर्षांत समीर वानखेडे यांनी कुटुंबासह सहा परदेश दौरे केल्याचेही समोर आले आहे. यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांमध्ये त्यांनी दौरा केला होता.

5/7

Sameer Wankhede family

समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय 55 दिवसांपेक्षा अधिक दिवस विविध देशात होते. यासाठी आपण 8.75 लाख रुपयांचा खर्च केल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले होते. मात्र या खर्चावरुन आता संशय व्यक्त केला जात आहे.

6/7

Sameer Wankhede flat

समीर वानखेडे यांनी दावा केला आहे की गोरेगावमधील पाचव्या फ्लॅटसाठी 82.8 लाख रुपये खर्च केले आहेत, ज्याची किंमत 2.45 कोटी रुपये आहे. वानखेडे आणि त्यांच्या पत्नीच्या आयकर विवरणपत्रात त्यांचे वार्षिक उत्पन्न 45,61,460 रुपये असल्याचे म्हटले आहे.

7/7

Sameer Wankhede watch

समीर वानखेडे यांच्याकडे महागडी घड्याळे आणि इतर मालमत्ताही असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहेत. वानखेडेंकडे रोलेक्स घड्याळही आहे. घड्याळाची किंमत 22 लाख रुपये आहे, मात्र त्यांनी ते 17 लाख रुपयांना विकत घेतल्याचे म्हटले होते. (सर्व फोटो - PTI)