एकूण 35 वर्षे खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळतं?

Job Pension News : अशा या निवृत्तीवेतनाचं गणित तुम्हाला ठाऊक आहे का? हे गणित समजून घेणं अतिशय गरजेचं आहे.   

Nov 16, 2023, 17:39 PM IST

Job News : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी निवृत्तीवेतनही पगाराइतकंच महत्त्वाचं आहे. उतारवयातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी याच रकमेची मोठी मदत होते. 

1/7

ईपीएस

how much monthly pension will private firm employees get

ऑर्गनाईज्ड सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएस (एम्लॉई पेंशन स्कीम)ची सुविधा असते. EPFO कडून ही योजना संचलित केली जाते. 

2/7

जास्तीत जास्त सेवा 35 वर्ष

how much monthly pension will private firm employees get

समजा ईपीएससाठी कमाल मूळ वेतन (Basic Salry + DA) 15 हजार रुपये आहे. यामध्ये पेन्शनसाठी जास्तीत जास्त सेवा 35 वर्षांची असणं अपेक्षित आहे.  हा कर्मचारी वयाच्या 58 व्या वर्षानंतर पेन्शनसाठी पात्र असेल. 

3/7

पेन्शनचं लाभार्थी

how much monthly pension will private firm employees get

पेन्शनचं लाभार्थी होण्यासाठी किमान 10 वर्षे नोकरीवर असणं गरजेचं आहे. 50 वर्षांनंतर आणि 58 व्या वर्षापूर्वी पेन्शन घेण्याची मुभा असते.   

4/7

कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास...

how much monthly pension will private firm employees get

कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळते. कर्मचाऱ्याची सर्विस हिस्ट्री 10 वर्षांहून कमी असल्यास त्यांना 58 व्या वर्षापासून पेन्शनची रक्कम मिळण्यास सुरुवात होते.   

5/7

EPS चं गणित

how much monthly pension will private firm employees get

EPS मध्ये हे गणित सोपं करण्यात आलं आहे. इथं EPS = सरासरी पगार X पेन्शनेबल सर्विस / 70 असा हिशोब होतो.   

6/7

मूळ वेतन

how much monthly pension will private firm employees get

इथं सरासरी वेतन म्हणजे मूळ वेतन + DA. ही रक्कम मागील 12 महिन्यांच्या आधारे मोजली जाते.   

7/7

कोण लाभार्थी?

how much monthly pension will private firm employees get

EPS चं हे समीकरण 15 नोव्हेंबर 1995 च्या नंतर संघटित संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होतं. त्याआपूर्वीच्या कर्मचाऱ्यांना वेगळे नियम लागू होतात.