नवऱ्याने 500 रुपयात विकलं, अन् ती बनली मुंबईची पहिली महिला डॉन

Mar 09, 2021, 21:54 PM IST
1/5

आपलं नशीब आजमविण्यासाठी मुंबईत गंगुबाई आली खरी पण तिला काय माहित होतं की, ज्याच्यावर ती विश्वास ठेवून आली. तोच तिला फक्त 500 रुपयात विकून टाकेल. कोवळ्या वयातच गंगूबाईवर नवऱ्याने अत्याचार केला. त्यानंतर मुंबईतील रेड लाईट भागात तिला वेश्या व्यवसायात ढकललं. 

2/5

अत्याचाराची ही मालिका इथे संपलीच नव्हती. हुसेन जैदी यांच्या कादंबरीतील उल्लेखानुसार माफिया डॉन करीम लाला याच्या गँगमधील एका गुंडाने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर ती न्यायासाठी करीम लाला ह्याला भेटली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने राखी बांधून त्याला आपलं भाऊ देखील मानलं. त्यामुळे तिचा धाक वाढला आणि फिमेल डॉन/ माफिया क्वीन अशी तिची नव्यानं ओळख बनली.   

3/5

तिने मुंबईतील कामाठीपुरात स्वत:चे कोठे सुरू केले. असं सांगितलं जातं की ती कुठल्याही मुलीला तिच्या इच्छे विरुद्ध कोठ्यावर घेत नव्हती. एवढंच नाही तर विश्वासघात करून कोठ्यावर आणलेल्या महिलांना तिने परत त्यांच्या घरी पाठवलं. पुढे तिने आपल्या प्रसिद्धीचा, ताकदीचा, अधिकाराचा वापर वेश्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी तसंच त्यांना सशक्त करण्यासाठी केला.

4/5

गंगूबाईची दुसरी ओळख म्हणजे मुंबईतील हिरामंडी येथे ती कोठा चालवायची आणि देशातील इतरही भागात ती हा व्यवसाय काढणारी पहिली महिला होती. पुढे महिला सशक्तीकरण आणि महिला अधिकारासाठी लढणाऱ्या गंगूबाईने स्थानिक राजकारणात उडी मारली आणि त्यात यश मिळवलं.   

5/5

६०च्या दशकातील भाषणाची दखल त्या वेळच्या मोठ्या वृत्तपत्रांनी, तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतली. गंगूबाईंचं पुढे कार्य एवढं वाढत गेलं की सेक्स वर्कर्स त्यांना 'गंगूमॉं' देखील म्हणत. अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीसुद्धा त्या घेत असत. गंगूबाईने वेश्या व्यवसायातील महिलांसदर्भात केलेल्या कार्यामुळे आयुष्याच्या शेवटानंतरही गंगूबाईंचा फोटो आजही कामाठीपुऱ्यातील कोठ्यांच्या भिंतीवर आढळतो.