अभिनेत्री बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आली, पण बनली सेक्स वर्कसची 'गंगू माँ'

Mar 09, 2021, 20:55 PM IST
1/6

अभिनेत्री आशा पारेख, हेमामालिन सारखं बनावं अशी तिची इच्छा. अभिनेत्री होण्याचं ते स्वप्न मात्र स्वप्नच राहिलं आणि कोणी विचारही केला नसेल असं काही घडलं.

2/6

गंगूबाई काठीयावाडी हे नाव अनेकांना माहित असेल आणि नसेलही. मूळ नाव गंगा हरजीवनदास काठीयावाडी, मूळची गुजरातची. गंगूबाईचा जन्म १९३९ मध्ये एका साध्या, संपन्न अशा कुटुंबात झाला. तिचं कुटुंब वकिली व्यवसायाशी जोडलेलं होतं. गंगूबाई ही त्या परिवारातील एकूलती एक मुलगी होती. पण लहानपणापासून गंगूबाईला बॉलिवडूच्या अभिनेत्रींची भूरळ होती. 

3/6

गंगूबाईला नेहमीच चित्रपटात काम करावं असं वाटायचं. त्या स्वप्नांसाठी बॉलिवूडची नगरी असलेल्या मुंबईचं देखील आकर्षण हळूहळू वाढत गेलं आणि अशातच मुंबईतील एक मुलगा रमणीकलाल तिच्या वडिलांचा अकाउंटंट बनून आला. 

4/6

अवघ्या १६ वर्षाची असलेल्या गंगूबाईला आपली स्वप्नं ह्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण होतील अशी भाबडी आशा वाटली. गंगूबाई त्या मुलाच्या प्रेमात पडली. प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं; तेही फिल्मी स्टाईलनेचं घरातून पळून कारण गंगूबाईला ह्या लग्नासाठी घरातूनच विरोध होता.

5/6

आपलं नशीब आजमविण्यासाठी ती आपल्या पतीसोबत मुंबईत आली. काही काळानंतर या कोवळ्या अशा गंगूबाईवर तिच्या नवऱ्याने अत्याचार केला. अवघ्या ५०० रुपयांसाठी तिला मुंबईतील रेड लाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात तिची फसवणूक करून तिला वेश्या व्यवसायात ढकललं. 

6/6

तेव्हा पासून गंगूबाईच्या नशिबानं आपली कूस बदलली. अशा परिस्थितीत आपले कुटुंबीय आपला स्विकार करणार नाही ह्या जाणीवेने तिने ह्या परिस्थिती सोबत तडजोड केली.