गॅस सिलिंडरची एक्सपायरी डेट कशी ओळखायची? जाणून घ्या...

LPG Gas Cylinder : पूर्वीच्या काळी स्त्रियांना चुलीवर जेवण करताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्यावर आता उपाय म्हणून एलपीजी सिलिंडर आले. सिलिंडरमुळे स्वयंपाक करणे सोपे झाले आहे. मात्र धोकाही वाढला आहे. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सिलिंडरचा स्फोट होण्याचे प्रकार घडले आहेत. त्याच्यामुळे अनेकदा जीवितहानी देखील होते. मात्र हा स्फोट होतोच कसा?

Apr 29, 2023, 20:07 PM IST
1/6

ten minutes for a cylinder to burst

गॅस सिलिंडरचा स्फोट हा गॅसची गळती आणि ज्यामध्ये तो भरला आहे त्या सिलिंडरची मुदत या दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एखादा सिलिंडर फुटण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचा कालावधी लागतो. 

2/6

gas cylinder leakage

त्यामुळे जर गॅस गळती होत असले आणि तुम्ही वेळीच लक्ष्य दिलं तर हा स्फोट टाळता येऊ शकतो. सिलिंडर लीक झाल्यावर गॅसचा वास येऊ लागतो त्यामुळे असं होत असेल तर ताबडतोब गॅस आणि दिवे बंद करा.

3/6

gas cylinder blast

गॅस लीक झाला आणि एखादी ठिणगी पडली तर मोठी आग लागू शकते. सिलिंडरमधला गॅस कमी झाल्यावर त्यातला प्रेशर कमी होतो आणि आग सिलिंडरमध्ये जाते आणि स्फोट होतो.

4/6

gas leakage

जेव्हा गॅस गळती होते तेव्हा अगदी लहान ठिणगी देखील आग लावू शकते. एक लहान ठिणगी आग पकडू शकते, ज्यामुळे सिलिंडरमधील गॅस कमी होताना त्यातील दाब कमी होईल. कमी दाबामुळे आग सिलेंडरच्या आत जाते आणि सिलेंडरचा स्फोट होतो.

5/6

LPG Cylinder old

जर तुमचा सिलिंडर जुना किंवा कालबाह्य असला तरीही स्फोट होऊ शकतो. गॅस सिलिंडवर त्याच्या निर्मितीची तारीख लिहिलेली असते ज्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो.

6/6

LPG Expiry Date

सिलिंडरवर A, B, C, D सोबत वर्ष लिहिलेले असते ज्यावरुन त्याची एक्सपायरी डेट ओळखता येते. A म्हणजे जानेवारी ते मार्च, B म्हणजे एप्रिल ते जून, C म्हणजे जुलै ते सप्टेंबर आणि D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर. त्यामुळे या अक्षरांसोबत सिलिंडरवर लिहिलेल्या आकड्यावरुन त्याची एक्सपायरी डेट ओळखता येऊ शकते.