रव्यापासून अळ्यांना दूर कसं ठेवायचं? पाहा सोप्या Kitchen Tips

kitchen tips : हे पदार्थ साठवून ठेवत असताना अनेकजण, अनेकजणी काही काळजी घेतात. पण, बऱ्याचदा कितीही काळजी घेतली तरीही बराच काळ काही गोष्टी वापरल्या गेल्या नाहीत, की ते खराब होण्यास सुरुवात होते. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे रवा. 

Jul 31, 2023, 14:51 PM IST

Kitchen Tips : घरात जेव्हाजेव्हा वाणसामान येतं तेव्हातेव्हा आई, पत्नी, बहीण किंवा घरातील स्वयंपाकघराचा ताबा असणारी व्यक्ती वेळ न दवडता ते सामान योग्य ठिकाणी ठेवते. अमुक जिन्नसासाठी तमुक एक डबा ही अशी गणितं प्रत्येकानंच ठरवलेली असतात. 

1/6

रव्याचे पदार्थ

home remedies for Bugs And Worms From Rava Or Semolina

अनेकांच्याच दैनंदिन आहारातही रव्याच्या विविध पदार्थांचा समावेश केला जातो. काही मंडळी त्यांच्या रोजच्या डाएटमध्येही रव्याचे पदार्थ खातात. दीर्घ काळ पोट भरलेलं ठेवायचं असल्यास रव्याच्या पदार्थांचं सेवन आवडीनं केलं जातं. पण, हाच रवा साठवायचा म्हटलं की नाकीनऊ येतात. कारण, वातावरण बदलण्यास सुरुवात झाली की लगेचच रव्यामध्ये किटक, अळ्या पडण्यास सुरुवात होते. 

2/6

किचन टीप्स

home remedies for Bugs And Worms From Rava Or Semolina

अनेकदा रव्यामध्ये किडे, किटक किंवा अळ्या दिसल्यास काही मंडळी तो फेकून देतात. पण, असं न करताही तुम्ही हा रवा स्वच्छ ठेवून तो वापरू शकता. कसा? त्यासाठी पाहा काही सोप्टा किचन टीप्स.... 

3/6

उन्हाची मदत

home remedies for Bugs And Worms From Rava Or Semolina

रव्यामध्ये असणाऱ्या अळ्या अतिशय लहान असतात, त्यामुळं त्या एकएक वेचणंही फार कठीण. त्यामुळं रव्यामध्ये तुम्हाला अळ्या किंवा किटक दिसल्यास त्याला ऊन दाखवा. असं केल्यामुळं किडे निघून जातात किंवा नष्ट होतात. त्यानंतर बारीक चाळणीतून तुम्ही रवा चाळवून तो स्वच्छ करू शकता. 

4/6

कापराचा वापर

home remedies for Bugs And Worms From Rava Or Semolina

रवा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कापराचाही वापर करु शकता. पुजेसाठी वापरात आणला जाणारा कापूर एखाद्या कापडात बांधून रव्याच्या डब्यात ठेवल्यास त्या वासानं अळ्या किंवा किटक, किड्यांचा प्रादुर्भाव टाळता येतो. कापराचा वास जास्त येतोय असं वाटल्यास रवा जेव्हा वापरण्यासाठी एखाद्या भांड्यात घ्याल तेव्हा त्यामध्ये कापराची वडी ठेवा. एका क्षणात किटक, किडे पळून जातील. 

5/6

पाण्याचा वापर

home remedies for Bugs And Worms From Rava Or Semolina

रवा वापरण्यापूर्वी तुम्ही तो स्वच्छ धुवूनही घेऊ शकता. यासाठी एका भांड्यात रवा घेऊन तो काही मिनिटं पाण्यात ठेवा. त्यातला कचरा आपोआप पाण्यावर तरंगेल. रवा वापरण्यापूर्वी तुम्ही तो स्वच्छ धुवूनही घेऊ शकता. यासाठी एका भांड्यात रवा घेऊन तो काही मिनिटं पाण्यात ठेवा. त्यातला कचरा आपोआप पाण्यावर तरंगेल.   

6/6

मीठाचा खडा

home remedies for Bugs And Worms From Rava Or Semolina

रवा स्वच्छ ठेवण्यासाठीचा आणखी एक उपाय म्हणजे एका सुती कापडामध्ये मीठाचे खडे बांधून ते रव्याच्या डब्यात ठेवा. किंवा कडुलिंबाची वाळलेली पानंही तुम्ही रव्याच्या हवाबंद डब्यात ठेवू शकता. ज्यामुळं त्यामध्ये किडे, अळ्यांचा वावर रोखता येतो.