Holi 2024 : कुठे चप्पलांनी तर कुठे भस्माने! भारताच्या विविध भागात अशी साजरी होते होळी

Holi 2024 : होळीचा सण हा रंगांचा...पण भारतातील काही भागामध्ये कुठे काठ्या, तर कुठे चिखलाने तर कुठे फुलांची होळी खेळली जाते. अगदी भारतातल्या या ठिकाणी स्मशानात होळी खेळली जाते. इथे अगदी गुलाला ऐवजी चितेवरचे भस्म उधळले जाते. 

Mar 17, 2024, 12:44 PM IST
1/8

चिखलाची होळी

करौलीतील होळीच्या सणाला माती आणि शेणापासून ढाल बनवण्याची परंपरा आहे. तसंच माती आणि शेणापासून बनवलेले हे कवच कुटुंबाचं रक्षण करतात अशी मान्यता आहे. त्याशिवाय पुरुष घराच्या छतावरून महिलांवर रंग फेकतात तर खाली चौकात जमलेल्या महिला रंग फेकणाऱ्या लोकांवर चिखलाचे लोट फेकतात, अशी ही अनोखी परंपरा आहे. 

2/8

चिखलाची होळी

मथुरेतील नौझील परिसरात होळीच्या दुसऱ्या दिवशीची ही चिखलाची होळी खेळली जाते. या गावात तरुण-तरुणींचे टोळके रस्त्यावर फिरतात आणि मातीने होळी खेळताना दिसतात. 

3/8

हुरंगा होळी

मथुरेजवळील दौजी मंदिरात होळीच्या दुसऱ्या दिवशी पुरुष आणि स्त्रिया पारंपारिक हुरंगा खेळ खेळण्याची परंपरा आजही पाळली जाते. या सोहळ्यात  पुरुष महिलांवर रंगाच्या बादल्या ओततात तर महिला त्यांचे शर्ट फाडतात. ही होळी खास करुन देवभाभीमध्ये खेळली जाते. 

4/8

लड्डू होळी

भारतातील ही अनोखी होळी मथुरामध्ये खेळी जाते. इथे रंगाऐवजी शेकडो किलो लाडूची उधळण केली जाते. ही होळी पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात.   

5/8

लठमार होळी

लठमार होळी ही बरसानामध्ये खेळली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान कृष्ण आणि त्याचे मित्र नांदगावहून बरसानामध्ये राधा आणि सखींसोबत होळी खेळायला येतात. असं म्हणतात की, बरसाणामध्ये होळीला महिला पुरुषांचं स्वागत रंगरंगोटी आणि काठी मारून केलं जातं. 

6/8

फुलांची होळी

मथुरामध्ये फुलेरा दूजपासून फुलांची होळी खेळली जाते. मथुरा आणि ब्रज क्षेत्राची होळी फक्त भारतातच नाही तर परदेशातही खूप प्रसिद्ध आहे. परदेशातून पर्यटक मथुरेत होळी पाहिला आणि खेळायला येतात. 

7/8

छडीमार होळी

गोकुळात छडीमार होळी साजरी करण्यात येते. इथे होळीच्या दिवशी गोपींच्या हातात रंग नाही तर काठ्या असतात आणि त्या होळी खेळायला आलेल्या कान्हावर लाठ्यांचा वर्षाव करताना दिसतात. 

8/8

चित्तेच्या भस्मासोबत होळी

काशीमध्ये मसाने की होळीची परंपरा आहे. इथे रंगांनी नव्हे तर चित्तेच्या राखेने होळी खेळायची प्रथा आहे. विशेष म्हणजे ही होळी स्मशानभूमीत खेळली जाते. असं म्हणतात की, स्मशानभूमीत भूत, पिशाच, यक्ष गंधर्व इत्यादींशी त्यांना होळी खेळता येत नाही. म्हणूनच रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिवजींनी स्मशानभूमीत राहणाऱ्या भूत आणि पिशाचांसह होळी खेळली, अशी आख्यायिका आहे.