कॅल्शिअम वाढवण्यासाठी हे 9 पदार्थ ठरतात फायदेशीर

दूग्धजन्य पदार्थ आणि दुधात कॅल्शिअमची मात्रा भरपूर प्रमाणात असते. असं असलं तरी काही जणांना दुधाची अॅलर्जी होते. म्हणूनच कॅल्शिअम वाढवण्यासाठी दुधाला पर्याय असणारे पदार्थ  जाणून घेऊयात. 

Feb 29, 2024, 20:51 PM IST
1/10

पांढरे तीळ

पांढरे तीळ हे उष्णतावर्धक असल्याचं सांगितलं जातं. थंडीच्या दिवसात किंवा अन्य काही कारणाने गुडघेदुखी होत असल्यास पांढऱ्या तीळाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. त्यातप्रमाणे तीळाच्या तेलाने पायाला मालिश केल्यास आराम पडतो.  

2/10

आवळा

आवळ्यात असलेल्या कॅल्शिअमुळे दातांचं आरोग्य सुधारतं. हिऱड्यातून रक्त येणं, दाढ दुखणं यावर आवळा गुणकारी आहे. आवळ्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते

3/10

बदाम

बदामात व्हिटामीन ई बरोबरच कॅल्शिअमची मात्रा मुबलक असंते. बदाम हे उष्ण असल्याने असल्याने थंडीत हाडांच्या बळकटीसाठी बदाम फायदेशीर ठरतात. 

4/10

पीनट बटर

हाडांच्या आरोग्यासाठी पीनट बटर फायदेशीर ठरतं. कॅल्शिअम वाढवण्याबरोबरच पीनट बटरमुळे रक्तातील लोहाची कमी भरून निघण्यास मदत होते.   

5/10

मासे

प्रोटीन सोबतच कॅल्शिअमसाठी मासे खाणं आरोग्यवर्धक मानलं जातं. माश्यांमध्ये कॅल्शिअम भरपूर आढळते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरतात. 

6/10

अंजीर

अनेकदा मिठाईमध्ये अंजीरचा समावेश केला जातो. त्याचप्रमाणे अंजीरमध्ये असलेल्या कॅल्शिअममुळे हाडांचं आरोग्य उत्तम राहतं. याशिवाय मासिकपाळीत पायात गोळे येत असल्यास अंजीर खाणं फायदेशीर ठरतं. 

7/10

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेल्या बीटा कॅरोटीनमुळे  रक्तातील लोहाची पातळी वाढवण्यासोबतच कॅल्शिअमची कमी भरून निघण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्याचं सेवन केल्यास डोळ्यांचे आजार कमी होण्यास मदत होते. 

8/10

सोयाबीन

मासांहार पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअमची मात्रा असते, पण जर तुम्ही मांसाहार खात नसाल तर तुम्ही कॅल्शिअम वाढवण्याकरीता आहारात सोयाबीनचा समावेश करू शकता. सोयाबीनच्या सेननाने रक्तदाब नियंत्रणात राहण्याबरोबरच हाडांचं आरोग्य सुधारतं.   

9/10

गूळ

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबतच हाडे मजबूत होण्यास गूळ फायदेशीर ठरतं. गूळ हे उष्णतावर्धक असून पचनसंस्था सुधारण्यास मदत करतं. 

10/10

नाचणी

नाचणीचं सत्व लहान मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर मानलं जातं. नाचणीमध्ये कॅल्शिअमची मात्रा मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे आठवड्यातून किमान दोनदा नाचणीचं सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.