हिरोने बाजारात आणली Xtream 125R, तुमच्या बजेटमध्ये दमदार फिचर्सची बाईक

Hero Xtream 125R:  20 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुमच्या जवळच्या डीलर्सकडून ही बाईक तुम्हाला घेता येणार आहे. 

| Jan 23, 2024, 15:53 PM IST

Hero Xtream 125R: हिरो एक्सट्रीम बाईकची एक्स-शोरूम किंमत 95 हजार रुपये आहे. 125 सीसी सेगमेंटमध्ये जबरदस्त स्पर्धा देण्यासाठी ही बाईक ऑटो मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक TVS Raider शी स्पर्धा करेल.

1/9

हिरोने बाजारात आणली Xtream 125R, तुमच्या बजेटमध्ये दमदार फिचर्सची बाईक

Hero Xtream 125R Launches Powerful Features Auto Marathi News

Hero Xtream 125: एक लाखाच्या आत दमदार फिचर्स असलेली बाईक शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील आघाडीची बाईक उत्पादक कंपनी  हिरो मोटोकॉर्पने तुमच्यासाठी बजेटमध्ये दमदार फिचर्सची बाईक आणली आहे. हिरो एक्स्ट्रीम 125R ही नवी बाईक 125 सीसी कॅटेगरीत आहे. 

2/9

एक्स-शोरूम किंमत

Hero Xtream 125R Launches Powerful Features Auto Marathi News

हिरो एक्सट्रीम बाईकची एक्स-शोरूम किंमत 95 हजार रुपये आहे. 125 सीसी सेगमेंटमध्ये जबरदस्त स्पर्धा देण्यासाठी ही बाईक ऑटो मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक TVS Raider शी स्पर्धा करेल.

3/9

हेडलॅम्प

Hero Xtream 125R Launches Powerful Features Auto Marathi News

कंपनीने नवीन Extreme 125R मध्ये रेझर शार्प स्टाइलिंग हेडलॅम्प अपफ्रंट दिला आहे. लो-स्लंग हेडलॅम्प एलईडी टर्न इंडिकेटरसह येतो. 

4/9

स्पोर्टी लूक

Hero Xtream 125R Launches Powerful Features Auto Marathi News

बाईकच्या वरच्या बाजूला एलईडी डीआरएलसारखे फीचर्सही उपलब्ध आहेत. बाईकमध्ये स्प्लिट सीटची सुविधा आहे आणि स्पोर्टी लूकसाठी स्प्लिट ग्रॅब रेल उपलब्ध आहेत.

5/9

5 स्पीड गिअरबॉक्स

Hero Xtream 125R Launches Powerful Features Auto Marathi News

या बाइकमध्ये 125 सीसी सिंगल सिलेंडर ऑइल कूल्ड इंजिन आहे. हे 8250 rpm वर 11.39 bhp ची कमाल पॉवर जनरेट करते. याशिवाय बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे. बाईकच्या पुढील बाजूस 37 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक फोर्क्स आहेत.

6/9

स्टार्टिंग प्राइज

Hero Xtream 125R Launches Powerful Features Auto Marathi News

बाईकमध्ये सिंगल चॅनल एबीएस सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. कंपनीने बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस देखील दिला आहे.  ज्याची स्टार्टिंग प्राइज 99 हजार 500 रुपये आहे. 

7/9

ब्रेक सिस्टिम

Hero Xtream 125R Launches Powerful Features Auto Marathi News

बाईकच्या पुढच्या चाकात डिस्क ब्रेक तर मागच्या चाकात ड्रम ब्रेक्स आहेत. असे असले तरी बाईकच्या वेगवेगळ्या व्हेरियंटवर ब्रेक सिस्टिम उपलब्ध आहे.

8/9

3 रंगात बाईक

Hero Xtream 125R Launches Powerful Features Auto Marathi News

ही बाईक 5.9 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेगाने पळते. याशिवाय बाइकचे मायलेज 66 kmpl असून ही बाईक 3 रंगात उपलब्ध आहे. 

9/9

फेब्रुवारी 2024 पर्यंत उपलब्ध

Hero Xtream 125R Launches Powerful Features Auto Marathi News

यामध्ये कोबाल्ट ब्लू, फायरस्टॉर्म रेड आणि स्टॅलियन ब्लॅक यांचा समावेश आहे. ही बाईक IBS आणि ABS या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल.  20 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुमच्या जवळच्या डीलर्सकडून ही बाईक तुम्हाला घेता येणार आहे.