Health Tips: तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे? कारण जाणून व्हाल चकित!

भारतातील बरेच लोक तांब्याचे भांड्यातील पाणी पितात. कारण ते पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतं असे मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेद सांगतो. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते.  

Jan 08, 2023, 15:52 PM IST
1/5

तांब्याच्या भांड्यातील साठवलेलं पाणी, पचन क्रिया सुधारणे, सांध्याचे दुखने ते वजन कमी करण्यापर्यंत हे पाणी उपयोगी ठरते.   

2/5

मानवाच्या शरीरातील अंतस्रावी ग्रंथींमधून संप्रेरके थेट रक्तांमध्ये स्रवत असतात. शरीराचे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी ही संप्रेरके अत्यावश्यक असतात. पण तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायालाने थायरॉईड ग्रंथींचे कार्य बिघडत नाही. 

3/5

तांब्याचे पाणी हाडे मजबूत करून आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरते. ज्यामुळे ते संधिवातासाठी एक उत्कृष्ट उपचार बनते.

4/5

तांब्याचे पाणी शरीरात योग्य प्रमाणात तांबे असल्याने चयापचय वाढवून आणि चरबी जाळून वजन कमी करण्यास मदत करते.

5/5

तांब्याचे पाणी प्रदूषक आणि हानिकारक जंतूंना बाहेर काढते. पोटाची जळजळ कमी करते आणि चयापचय वाढवते, पचनास मदत करते.