Should Drink Water Before Sleep: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे योग्य की अयोग्य?

Should Drink Water Before Sleep In Marathi: रात्री कमीत कमी ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास सकाळी फ्रेश वाटत नाही त्यामुळं कामाचा उत्साहही जाणवत नाही. अनेकदा झोप न येण्यामागे आपण काय खातो व आपली लाइफस्टाइल कशी आहे हेदेखील कारणीभूत ठरते. 

| Sep 26, 2023, 16:53 PM IST
1/8

Should Drink Water Before Sleep: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे योग्य की अयोग्य?

health tips disadvantages of drinking water before sleeping in marathi

रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे योग्य की अयोग्य याबाबत अनेक समज गैरसमज आहेत. पाणी पिणे हे शरीरासाठी फायदेशीर आहे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते त्यामुळं अनेक आजारांचा धोका टळतो. मात्र, रात्री पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याबाबत जाणून घेऊया. 

2/8

आरोग्याला नुकसान

health tips disadvantages of drinking water before sleeping in marathi

 रात्री वेळेत आहार घेणे, लवकर झोपणे हे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असते. त्याचबरोबर रात्री अतिप्रमाणात पाणी प्यायल्यामुळंही आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. झोपण्यापूर्वी किती तास अगोदर पाणी प्यावे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. 

3/8

वारंवार लघवी

health tips disadvantages of drinking water before sleeping in marathi

 काही जण रात्रीही भरपूर पाणी पितात मात्र, अतिप्रमाणात पाणी प्यायल्यामुळं वारंवार लघवीसाठी उठावं लागतं. अशामुळं झोपमोड होते आणि झोप नीट झाली नाही तर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. 

4/8

किडनीसंबंधीत समस्या

health tips disadvantages of drinking water before sleeping in marathi

रात्रीच्या वेळी तहान लागल्यास थोडेसेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनीसंबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात. 

5/8

रक्तदाब

health tips disadvantages of drinking water before sleeping in marathi

 तसंच वारंवार लघवीला उठल्यामुळं झोप कमी होते. व झोप कमी झाल्यामुळं रक्तदाब वाढू शकतो. 

6/8

हृदयविकाराचा धोका

health tips disadvantages of drinking water before sleeping in marathi

झोप कमी झाल्यामुळं व झोपमोड झाल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू सकते. झोपेच्या कमतरतेमुळं एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढते त्यामुळं हृदयविकाराचा धोका वाढतो.

7/8

रात्री कधी प्यावे पाणी

health tips disadvantages of drinking water before sleeping in marathi

झोपण्यापूर्वी किमान १ ते २ तास आधी पाणी प्यावे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 

8/8

Disclaimer

health tips disadvantages of drinking water before sleeping in marathi

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)