'हॅरी पॉटर'च्या Professor McGonagall चं निधन; ब्रिटनचे King Charles ही भावुक

Dame maggie smith: हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांनी वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 27 सप्टेंबर रोजी सकाळी लंडन मध्ये त्यांचे निधन झाले. 

Sep 28, 2024, 15:32 PM IST

Famous Hollywood actress passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांनी 27 सप्टेंबर रोजी लंडन मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या 89 वर्षांच्या होत्या. डेम मॅगी स्मिथ यांनी 'हॅरी पॉटर' आणि 'डाउंटन ॲबे' या चित्रपटांमध्ये काम केले होते. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांनी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.  पण त्यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. 

 

1/7

हॅरी पॉटरमधील प्रोफेसर मॅकगोनल आजही लोकप्रिय

डेम मॅगी स्मिथ या अतिशय प्रतिभावान अभिनेत्री होत्या. त्यांना त्यांच्या विनोदी भूमिकेसाठी जास्त प्रसिद्धी मिळाली. 'हॅरी पॉटर' सीरिजमधील त्यांची प्रोफेसर मॅकगोनलची भूमिका तर आजही प्रचंड लोकप्रिय आहे. 1934 साली ऑक्सफोर्डमध्ये स्मिथ यांचा जन्म झाला. प्लेहाऊस थिएटरमध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 1958 साली त्यांनी पहिल्यांदा ' नोवेयर टू गो' या चित्रपटात काम केले. 

2/7

डेम मॅगी स्मिथ ठरल्या 2 वेळा ऑक्सर विजेत्या

मॅगी स्मिथ यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये निव्वल कॉमेडीच नाही तर इतर भूमिकाही गाजवल्या आहेत. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत दोन ऑस्कर पुरस्कार पटकावला. 1970 मध्ये 'द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर आणि 1978 मध्ये 'कॅलिफोर्निया सूट'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला होता. 

3/7

मॅगी स्मिथ यांच्या निधनानंतर त्यांचे सहकलाकार आणि इतर कलाकारांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

'मॅगी स्मिथ या देशाला लाभलेल्या अतुलनीय  महान कलाकारांपैकी एक म्हणून कायम स्मरणात राहतील.' - द नॅशनल थिएटर

4/7

'लेजंड या शब्दाचा खूप अतिवापर झाला आहे. पण आपल्या क्षेत्रात जर हा शब्द कोणासाठी वापरायचा असेल तर ती व्यक्ती मॅगी स्मिथ आहे'- डॅनियल रॅडक्लिफ

5/7

'मॅगी स्मिथ खरंतर आमचा राष्ट्रीय खजिना आहेत. पण जगभरातील लोक त्यांचे आणि त्यांच्या कामाचे स्मरण करत आहेत.' - किंग चार्ल्स  

6/7

'मॅगी स्मिथ एक महान स्त्री आणि एक हुशार अभिनेत्री होती' - हूपी गोल्डबर्ग तिच्या एवढे प्रतिभावंत कोणीही नाही... उल्लेखनीय अष्टपैलू व्यक्तीमत्त्व- मिरियम मार्गोलीस

7/7

(छायाचित्र सौजन्य: बीबीसी न्यूज) मॅगी स्मिथ यांनी फक्त मनोरंज केले नाही तर आपल्या सिनेमातून नवा विचारही दिला. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे मित्र आणि कुटुंब हजर होतं. त्यांना दोन मुले आणि एकूण पाच नात-नातू आहेत. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.