नताशा पहिली नाही पाचवी! लग्नाआधी हार्दिकने 'या' 4 सौंदर्यवतींना केलंय डेट; नावं वाचून चकित व्हाल

Hardik Pandya Dating History 4 Alleged Affairs Before Marrying Natasa Stankovic: खरं तर नताशा स्टॅनकोविक ही हार्दिकबरोबर नाव जोडलं गेलेली पहिली अभिनेत्री नाही. नताशाबरोबर लग्न करण्याआधी हार्दिक पांड्याचं नाव एक दोन नाही तर तब्बल चार जणींशी जोडलं गेलं. या चार जणी कोण आणि हार्दिकचं त्यांच्याबरोबर नातं कसं होतं पाहूयात...

Swapnil Ghangale | May 28, 2024, 16:14 PM IST
1/8

Hardik Pandya Affairs Divorce Rumours Natasa Stankovic

इंडियन प्रिमिअर लीगमध्ये सुमार कामगिरीमुळे चर्चेत असलेला हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.   

2/8

Hardik Pandya Affairs Divorce Rumours Natasa Stankovic

काही दिवसांपूर्वी हार्दिकची पत्नी नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमधून पांड्या हे नाव काढून टाकल्याने या कथित घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. नताशा मागील आयपीएल पर्वांप्रमाणे यंदा एकाही सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित दिसली नाही. त्यामुळेच हे दोघे विभक्त होण्याची चर्चा जोर धरु लागली.  

3/8

Hardik Pandya Affairs Divorce Rumours Natasa Stankovic

केवळ नताशाच नाही तर हार्दिकच्या वागण्यातील बदलही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. हार्दिक पंड्याने नताशाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाच दिल्या नसल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. ही सगळी चर्चा सुरु असतानाच आता हार्दिकच्या खासगी आयुष्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे.  

4/8

Hardik Pandya Affairs Divorce Rumours Natasa Stankovic

खरं तर नताशा ही हार्दिकबरोबर नाव जोडलं गेलेली पहिली अभिनेत्री नाही. नताशाबरोबर लग्न करण्याआधी हार्दिक पांड्याचं नाव एक दोन नाही तर तब्बल चार जणींशी जोडलं गेलं. या चार जणी कोण आणि हार्दिकचं त्यांच्याबरोबर नातं कसं होतं पाहूयात...  

5/8

Hardik Pandya Affairs Divorce Rumours Natasa Stankovic

हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री एली अवराम हे दोघेही एकमेकांबद्दल फार गांभीर्याने विचार करत होते. हे दोघे एकमेकांच्या एवढ्या जवळ होते की एली अवरामने हार्दिकच्या मोठ्या भावाच्या लग्नाही हजेरी लावली होती. मात्र नंतर हे दोघे वेगळे झाले.  

6/8

Hardik Pandya Affairs Divorce Rumours Natasa Stankovic

हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री ईशा गुप्ता या दोघांची भेट एका पार्टीमध्ये झाली होती. हे दोघेही एकमेकांशी फार बोलायचे. मात्र या दोघांपैकी कोणीही या नात्याबद्दल उघडपणे कधीच कबुली दिली नाही.  

7/8

Hardik Pandya Affairs Divorce Rumours Natasa Stankovic

हार्दिक पंड्याने अभिनेत्री उर्वशी रौतेलाही डेट केल्याचं सांगितलं जातं. या दोघांच्या कथित अफेरची मनोरंजन सृष्टीत चांगलीच चर्चा होती. मात्र दोघांनीही कधीच यासंदर्भात काही प्रतिक्रिया नोंदवली नाही.

8/8

Hardik Pandya Affairs Divorce Rumours Natasa Stankovic

हार्दिक पंड्याने मॉडेल आयशा शर्माला बराच काळ डेट केलं होतं. मात्र दोघांनी आपआपल्या करिअवर लक्ष्य केंद्रित करण्याच्या उद्देशाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.