PHOTO : वयाचं अंतर, कॉलेज कट्ट्यावरील भेट, बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरेंची 'लव्ह स्टोरी'

Raj Thackeray Happy Birthday :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला आहे, हे नक्कीच आश्चर्य वाटेल. पण ती कॉलेज कट्ट्यावरील भेट आज जन्मजन्मांतरीची साथ ठरली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं? 

Jun 14, 2024, 12:56 PM IST
1/7

शर्मिला वाघ या शर्मिला ठाकरे कशा झाल्या तर, राज ठाकरे यांची भेट रूपारेल कॉलेजच्या कट्ट्यावर झाली होती. शिरीष पारकर नावाच्या एका कॉमन फ्रेंडद्वारे ही ओळख झाली होती. पहिल्याच भेटीत राज ठाकरे शर्मिला यांच्या प्रेमात पडले होते. 

2/7

एका मुलाखतीत शर्मिला यांनी सांगितलं होत की, रुपारेल कॉलेजला झालेल्या भेटीनंतरच राज त्यांच्या मागे लागले होते. पण राज आता ते मान्यच करणार नाही. 

3/7

त्याच वेळी शर्मिला ठाकरे म्हणाल्यात की 'लग्नासाठी मागणीही त्यांनी घातली होती. मी त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. राज माझ्याशी बोलण्यासाठी लॅण्डलाईनवर फोन करायचा, मग आम्ही बोलायचो.'

4/7

शर्मिला यांचे वडील मोहन वाघ हे बाळासाहेब ठाकरे यांचे घट्ट मित्र होते. त्यामुळे राज आणि शर्मिला यांच्या लग्नात कोणतीही अडचण आली नाही. शिवाय राज यांची बहीण आणि शर्मिला या दोघींही चांगल्या मैत्रिणी होत्या. 

5/7

शर्मिला ठाकरे या राज ठाकरे यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे जेव्हा शर्मिला यांच्या लग्नाचा विषय घरात सुरु झाला तेव्हा राज ठाकरेंचा विचार वर म्हणून झाला नाही. 

6/7

त्या म्हणाल्या की, शर्मिलाच्या वडिलांना राज तिच्यापेक्षा लहान आहेत याची कल्पना नव्हती. पण त्यांना शंका होती. त्यामुळे ते दरवर्षी वाढदिवसाला किती वर्षाची झालीस आणि राज किती वर्षाचा झाला? असं खोचक प्रश्न विचारायचे. 

7/7

त्या म्हणाल्या की, त्यांचं लग्न खूप कमी वयात झालं. लग्नाच्या वेळी राज ठाकरे यांचं वय 22 वर्ष होतं. राज आणि शर्मिला यांचं लग्न 11 डिसेंबर 1990 मध्ये झालं. तर अमितचा जन्मही लवकर झाला त्यामुळे राज फारच लहान दिसत होते.