PHOTO : 3 अफेअर, 44 वर्षींय अभिनेत्री लग्नाआधीच झाली होती प्रेग्नंट; आई-वडिलांनी दिला 72 तासांचा वेळ, अन् मग...

Entertainment :  आज आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिचा आज 44 वा वाढदिवस आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीने मिस इंडियाचा किताब पटकावला आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अभिनयासोबत तिच्या वैयक्तित आयुष्यामुळे ती चर्चेत राहिली आहे. 

| Aug 27, 2024, 17:53 PM IST
1/11

या अभिनेत्रीने सांगितलं की मी गर्भवती आहे, त्यानंतर घरात आनंदाऐवजी भीतीच वातावरण होतं. कारण तिचं अजून लग्न झालं नव्हतं. समाज काय म्हणले या भीतीने पालकांनी तिला बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी 72 तासांत वेळ दिला होता. त्यानंतर तिने बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं.     

2/11

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून नेहा धुपिया आहे. नेहा धुपियाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी केरळमधील कोचीमधील लष्करी कुटुंबात झाला. वडील प्रदीप सिंग धुपिया भारतीय नौदलात अधिकारी तर आई मणिपिंदर धुपिया गृहिणी आहेत. त्यांनी आपलं शालेय शिक्षण दिल्लीच्या नेव्हल पब्लिक स्कूलमधून झालंय. नंतर दिल्ली विद्यापीठाच्या जीझस अँड मेरी कॉलेजमधून इतिहासात ती पदवीधर आहे. 

3/11

नेहाचा जन्म लष्करी कुटुंबात झाला होता, त्यामुळे लहानपणापासून शिस्त तिचा आयुष्याचा भाग होता. अभ्यासादरम्यान तिने मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला आणि मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. 2002 च्या 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत देशभरातील अनेक स्पर्धकांवर मात करत नेहाने आत्मविश्वास, आणि बुद्धिमत्ता जोरावर 'फेमिना मिस इंडिया'चा खिताब जिंकला. त्यानंतर तिने मिस युनिव्हर्स 2002 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं, जिथे ती टॉप 10 मध्ये सहभागी झाली होती. 

4/11

नेहाने 2003 मध्ये 'कयामत: सिटी अंडर क्रीम' या चित्रपटापासून तिच्या चित्रपटाची कारकीर्द सुरू केली. या चित्रपटातील त्याच्या धाडसी भूमिकेने बरीच चर्चा झाली. नेहा तिच्या व्यावसायिक जीवनापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी अधिक चर्चेत राहिली. 

5/11

अंगद बेदी सोबत प्रेमात असताना अचानक प्रेग्नेंट असल्याच तिला कळलं. त्यामुळे अचानक अंगद बेदीशी तिने लग्न करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. 

6/11

नेहा धुपियाने 2018 मध्ये गुप्तपणे अंगद बेदीशी लग्न केलं आणि त्याच वर्षी मुलगी मेहर बेदी यांचा जन्मही झाला. हेच कारण होतं तिने लग्नाचा निर्णय तडकाफडकी घेतला होता.   

7/11

नेहाने एका मुलाखतीत लग्नाआधी प्रेग्नंट झाल्याबद्दल सांगितलं होतं आणि यावर तिच्या पालकांची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं. 'आमचं लग्न कोणत्याही तयारीशिवाय झालं. मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी माझ्या पालकांना सांगितलं. ते मला म्हणाले, छान आहे पण तुझ्याकडे लग्नासाठी फक्त 72 तास आहेत.

8/11

'त्यांनी मला लग्न करण्यासाठी फक्त अडीच दिवस दिला होता. माझ्या पालकांच्या सल्ल्यानुसार, मी मुंबईला पोहोचताच अंगदशी लग्न केलं. जर आपल्या निर्णयाने कोणालाही हानी पोहोचत नसेल तर आपण जे करू इच्छित आहात ते करण्यात काहीच नुकसान होणार नाही.'

9/11

2004 मध्ये नेहाने एक विधान केलं होतं. ज्यामुळे ती खूप जास्त चर्चेत आली होती. त्या विधानात तिने शाहरुख खानच नाव घेतलं होतं. 

10/11

त्यावेळी ती म्हणाली होती, बॉलिवूडमध्ये शारीरिक संबंध आणि शाहरुख खान या दोनच गोष्टी विकल्या जातात. या विधानावर ती तब्बल 20 वर्षांनीही ठाम होती. तिने सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यावर ठाम असल्याचा सांगितलं.   

11/11

नेहा धुपियाचा 2004 मधील जुली चित्रपटातील भूमिकाने चर्चेत आली होती. या चित्रपटात अनेक इंटिमेट सीन्स दिले. या चित्रपटात तिने शरीर विक्री करणाऱ्या महिलेची भूमिका केलीय. त्यावेळी एका मुलाखतीत ती म्हणाली होती, लोक म्हणतात की या चित्रपटामुळे मी मल्लिका शेरावत आणि बिपाशा बसूला मागे टाकलं. त्यांच्या या विचाराने मला काही फरक पडत नाही. आजच्या काळात एकतर शरीर संबंध विकला जातो किंवा शाहरुख खान.