4 वर्षात संसार मोडला, दर महिने पत्नीला देतो 10 लाख पोटगी, तरीही आहे 54 कोटींचा मालक

Mohammed Shami Net Worth: टीम इंडियाचा महान गोलंदाज मोहम्मद शमी आज 34 वर्षांचा झाला. शमीचा जन्म 3 सप्टेंबर 1990 रोजी अमरोहा, उत्तर प्रदेश इथे झाला. मोहम्मद शमी 2023 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्यानंतर जखमी झाला होता. मात्र, आता तो लवकरच पुनरागमन करणार असल्याच बोलं जातंय.

Sep 03, 2024, 15:39 PM IST
1/9

मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात काय केले हे सर्वांच्या लक्षात असेलच. केवळ 7 सामन्यामध्ये त्याने या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजचा मान मिळवला. 

2/9

मैदानावर चांगली कामगिरी करणा-या शमीने वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. शमीचे लव्ह लाईफ खूपच आव्हानात्मक होते. लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात घटस्फोटाचा ग्रहण लागलं. 

3/9

शमीने 2014 मध्ये हसीन जहाँशी लग्न केलं. त्यांचं वैवाहिक जीवन चार वर्षे सुरळीत चाललं होतं. पण त्यानंतर 2018 मध्ये हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार, मारहाण, विवाहबाह्य संबंध आणि मॅच फिक्सिंगसारखे अनेक गंभीर आरोप केले. 

4/9

एवढंच नाही तर हसीन जहाँने शमीविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती. यानंतर शमीच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. बीसीसीआयनेही त्याचा केंद्रीय करार रोखून धरला होता.

5/9

हसीन जहाँ एक चीअरलीडर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमी आणि हसीन जहाँ 2012 मध्ये भेटले आणि हळूहळू त्यांची मैत्री वाढू लागली जी नंतर प्रेमात बदलली. त्यानंतर दोघांनी 6 जून 2014 रोजी लग्न केलं होतं.

6/9

मीडियाच्या दाव्यानुसार शमी घटस्फोटानंतर पूर्वी पत्नीला तो दर महिन्याला 10 लाख रुपये देतो. असात त्याची संपत्ती किती आहे, ते पाहूयात. 

7/9

शमीची ब्रँड व्हॅल्यू दिवसेंदिवस वाढत असून त्याची एकूण संपत्ती ही 54 कोटी आहे. त्याचा कमाईचा मोठा हिस्सा हा आयपीएल आणि बीसीसीआयच्या करारातून येतो. 

8/9

याशिवाय तो जाहिरातींमधूनही कमाई करतो. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तो पैसे कमावतो. तो या डीलसाठी वर्षाला 1 कोटी एवढं मानधन घेतो. तो puma, hero motocorp, byjus आणि ceat यासह अनेक कंपन्यांशी करार करतो. 

9/9

मोहम्मद शमीकडे अमरोहामध्ये एक सुंदर फार्महाऊस असून त्याची किंमत 12-15 कोटींच्या घरात आहे. तर ऑडी, बीएमडब्ल्यू 5 सीरिज, जॅग्वार एफ टाइप आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या गाड्यांचं कलेक्शनही आहे.