PHOTO : फ्लॉप अभिनेता ते मॉडलिंगचा बादशाह! न्यूड फोटोशूट, गोव्यातील विवस्त्र फोटोपासून 26 वर्षांनी लहान तरुणीशी लग्न

Entertainment :  हा मराठमोळा अभिनेता अभिनयात फ्लॉप ठरला, पण मॉडलिंगमध्ये तो सर्वांचा बाप आहे. वयाच्या 59 वर्षी तो फिटनेस गुरु असून तो कायम वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत असतो.   

नेहा चौधरी | Nov 04, 2024, 12:45 PM IST
1/7

या अभिनेचत्याचं करिअर असो किंवा वैयक्तिक आयुष्य तो कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिला. या मराठी अभिनेत्याने न्यूड फोटोशूटपासून विवस्त्र फोटोपर्यंत कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो, मात्र वादाला तोंड फोडतो. 

2/7

 आम्ही बोलत आहोत, मिलिंद सोमण, अभिनेत्याचा आज 59 व्या वाढदिवस आहे. मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात केली आणि नंतर तो बॉलिवूडकजे वळला. पण एक अभिनेता म्हणून त्याला यश मिळालं नाही. 2000 मधील तरकीब या पहिल्या वहिल्या चित्रपट असो किंवा दोन वर्षांनंतर आलेला 16 दिसंबर असो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 

3/7

अखरे त्यांने पुन्हा मॉडेलिंग करायचा निर्णय घेतला. फ्लॉप अभिनेता आजही सुपरमॉडेल म्हणून आपली ख्याती बनवलीय. त्याच्या फॅशन सेन्स, रॅम्पवर चालण्याची स्टाइल आणि फिटनेसमुळे एक मोठा चाहत्या वर्ग त्याने निर्माण केलाय. 

4/7

एका चपलेच्या जाहिरातीसाठी त्याने मधू सप्रेसोबत न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटच्या वेळी त्या दोघांच्या शरीरावर केवळ एक अजगर गुंडाळलेला दाखविण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. 

5/7

धक्कादायक म्हणजे त्याचा 55 वाढदिवसाच्या दिवशी 2020 मध्ये त्याने गोव्यातील बीचवर न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो त्याची पत्नी अंकिता कोंवर काढला होता. कायम काही तरी वेगळं करण्याचा नांदात त्याने नवीन वादाला तोंड फोडलं. 

6/7

गोव्यातील एका स्थानिक राजकीय पक्षाने वास्को पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. मिलिंदचा हा फोटो गोव्याची प्रतिमा आणि संस्कृतीचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

7/7

त्याने वयाच्या 52 व्या वर्षी त्याच्यापेक्षा वयाने 26 वर्ष लहान तरुणीशी लग्न करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. अंकिता कोंवरशी मिलिंदची भेट एका नाइट क्लबमध्ये झाली होती. एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी अलिबागमध्ये 2018 मध्ये मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं.