केसांंच्या आरोग्यासाठी आवळा आरोग्यवर्धक

Apr 10, 2018, 12:26 PM IST
1/8

Hair benefits of Amla or Indian gooseberry

Hair benefits of Amla or Indian gooseberry

उन्हाळ्याच्या दिवसात  तीव्र उन्हामुळे केसांचे नुकसान होते. घामामुळे केस चिकट होतात. केसांंची वेळीच काळजी न घेतल्यास यामुळे टाळूवर इंफेक्शन होण्याचा धोका असतो. म्हणूनच केसांंचे आरोग्य खुलवण्यासाठी आहारात आणि नियमित वापरात आवळ्याचा अधिकाधिक कसा वापर करावा हे नक्की जाणून घ्या. 

2/8

Hair benefits of Amla or Indian gooseberry

Hair benefits of Amla or Indian gooseberry

केसांंचा रंग  आवळ्यामुळे केसांंचा रंग नैसर्गिक स्वरूपात राहण्यासाठी मदत होते. केमिकलयुक्त हेअर कलरचा वापर करण्याऐवजी आवळ्याचा वापर करा. नियमित एक आवळा आहारात समाविष्ट करा.  केसांंच्या मुळांंना आवळ्याचा लेप लावा त्यामुळे केसांंना नैसर्गिक स्वरुपात रंग मिळतो तसेच केसांंची वाढ सुधारते.    

3/8

Hair benefits of Amla or Indian gooseberry

Hair benefits of Amla or Indian gooseberry

अ‍ॅन्टिऑक्सिडंट   आवळ्यात अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात आवळ्याचा समावेश करा.   

4/8

Hair benefits of Amla or Indian gooseberry

Hair benefits of Amla or Indian gooseberry

केसगाळतीवर फायदेशीर  आवळ्यात व्हिटॅमिन सी घटक मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे केस तुटण्याची समस्या आटोक्यात राहते. तसेच केसांंची चमक सुधारते. आहारात आवळ्याचा समावेश करण्यासाठी कच्च्या स्वरूपातील आवळा, मुरांंबा, चटणी अशा विविध स्वरूपात त्याचा समावेश केला जाऊ शकतो.   

5/8

Hair benefits of Amla or Indian gooseberry

Hair benefits of Amla or Indian gooseberry

पोषक घटक मुबलक  आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, कॅरेटीन आणि व्हिटॅमिन बी घटक मुबलक असतात. याचा आरोग्याला फायदा होतो. त्यामुळे बाह्य वापराप्रमाणेच आहारातही आवळ्याचा समावेश करा. आवळ्याच्या सेवनाने डोळ्यांंचे, केसांंचे आरोग्य सुधारते.   

6/8

Hair benefits of Amla or Indian gooseberry

Hair benefits of Amla or Indian gooseberry

केसांची वाढ सुधारते  आवळ्याचा वापर केल्याने केस मुलायम आणि चमकदार होण्यासाठी मदत होते. तुम्हांंला केसांंची वाढ सुधारायची असेल तर आवळा फायदेशीर आहे. आवळा आणि मेहंदीची पावडर एकत्र करा. अर्धा कप पाण्यात मिसळा. या मिश्राणाने सकाळी नियामित केस स्वच्छ धुवावेत.      

7/8

Hair benefits of Amla or Indian gooseberry

Hair benefits of Amla or Indian gooseberry

हेयर मास्क  एक चमचा मेथी दाण्यांंना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर त्याची पेस्ट बनवा. यामध्ये चमचाभर आवळ्याची पावडर अअणि दही मिसळा. हा मास्क केसांवर लावा. एक दीड तासाने साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवावे. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.   

8/8

Hair benefits of Amla or Indian gooseberry

Hair benefits of Amla or Indian gooseberry

कंडिशनर - 1-2 अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये एक चमचा आवळ्याची पावडर मिसळा. त्यामध्ये एक चमचा मध मिसळा. हा पॅक केसांना लावण्यापूर्वी केस ओले करा. त्यानंतर केसांवर आवळ्याचा हेअर मास्क लावून सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.