तुमच्या आवडत्या अभिनेत्रीचे हे Insta Pics पाहिलेत का?

Mar 25, 2018, 20:31 PM IST
1/5

Disha Patani

Disha Patani

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने 'एमएस धोनी' या सिनेमापासूनच मीडियात खळबळ उडवून दिली. दिशाचे असंख्य चाहते आहेत आणि लवकरच दिशा 'बागी २' सिनेमात पहायला मिळणार आहे. या फोटोत दिशाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य: @dishapatani/ Instagram)

2/5

Priyanka Chopra

Priyanka Chopra

तर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुद्धा आपल्या फॅशनमुळे चांगलीच प्रसिद्ध आहे. प्रियांका सोशल मीडियात खूपच अॅक्टिव्ह असते. या फोटोत प्रियांका डार्क ब्ल्यू रंगाच्या ड्रेसमध्ये आणि खूपच सुंदरही दिसत आहे. (फोटो सौजन्य: @priyankachopra/ Instagram)

3/5

Katrina Kaif

Katrina Kaif

अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच 'झिरो' सिनेमात भूमिका करताना दिसणार आहे. कतरिनाने नुकतचं आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटो कतरिना खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य: @katrinakaif/ Instagram)

4/5

Yami Gautam

Yami Gautam

'बत्ती गुल मीटर चालू' या सिनेमात भूमिका करत असलेली अभिनेत्री यामी गौतम सोशल मीडियात खूपच कमी अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वीच यामीने आपला एक फोटो शेअर केला. या फोटोत यामी व्हाईट टॉप आणि ग्रे कलरच्या ट्राउजरमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य: @yamigautam/ Instagram)

5/5

Anushka Sharma

Anushka Sharma

अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियात खूपच प्रसिद्ध आहे. एका सर्वेक्षणात अनुष्का शर्मा सोशल मीडियातील प्रसिद्ध व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य: @anushkasharma/ Instagram)