शिर्डीमध्ये गुरूपौर्णिमा उत्सवाची धामधूम सुरू, पाहा फोटो

आषाढ पौर्णिमेस गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात.

Jul 15, 2019, 19:03 PM IST

मुंबई : आषाढ पौर्णिमेस गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये गुरू-शिष्य या नात्याला फार मोलाचे स्थान आहे. शिर्डीमध्ये गुरूपौर्णिमेच्या उत्सवास सुरूवात झाली आहे. गुरूपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर साईबाबांचे मंदिर, व्दारका माई, चावडी धाम पूर्णपणे फुलांनी सजवण्यात आली आहे. संपूर्ण मंदिराला फुलांमध्ये सजवण्यासाठी एकूण ६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. या खर्चाची जबाबदारी एका साई भक्ताने पार पाडली आहे. हा भक्त अमेरिकेचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

1/5

गुरूपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांची आरर्ती आणि स्नाना नंतर त्यांच्या चरणांची पूजा करण्यात येते. त्याचप्रमाणे बाबांच्या साई चरित्राचे अडंख पठण करण्यात येणार आहे आणि मंगळवारी सकाळी पाठाची सांगता होणार आहे.

2/5

त्याचबरोबर गुरूपौर्णिमेचे औचित्यसाधत येथे दही-हांडी फोडण्याचा कार्यक्रम देखील होणार आहे.   

3/5

गुरूपौर्णिमा पूर्ण देशभरात साजरी केली जाते. तसेच विद्यालय आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

4/5

या कालावधीत शिर्डीमध्ये असंख्य साई भक्त मोठ्या संख्येत उपस्थित असतात. शिवाय लाखो रूपयांचे दान देखील करतात. आपले पहिले गुरू हे आपले आई-वडील असतात. त्यानंतर आपले शिक्षक हे आपले गुरू असतात. 

5/5

आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.