Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात बनतोय अशुभ गुरु चांडाल योग, 4 राशींना 7 महिने आर्थिक नुकसान; हे करा उपाय

Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात काही राशींना जपून राहण्याची गरज आहे. कारण गुरु आणि राहू ग्रहाचा संयोगामुळे अशुभ गुरु चांडाल योग तयार होत आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Apr 08, 2023, 09:24 AM IST

Guru Chandal Yog 2023 upay in marathi : अवकाश बदलणाऱ्या ग्रह ताऱ्यांमुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनेक योग तयार होतं असतात. काही योग हे काही राशींच्या लोकांना धनवान बनवतात तर काही योग हे काही राशींच्या लोकांना आर्थिक संकटात टाकतात. लवकरच अशुभ गुरु चांडाल योग तयार होत असल्याने काही राशींवर संकट कोसळणार आहे. यातून बाहेर पडण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. (guru chandal yog 2023 Financial loss for 7 months for 4 zodiac signs and Guru Chandal Yog 2023 ke Upay in marathi )

1/6

गुरु चांडाल योग (Guru Rahu Yuti 2023)

हिंदू पंचागानुसार 22 एप्रिल 2023 गुरु आणि राहूच्या संयोगामुळे गुरु चांडाल योग तयार होत आहे. याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. हा योग 4 राशींच्या लोकांसाठी आर्थिक संकट घेऊन येणार आहे. चला जाणून घेऊयात त्या कुठल्या राशी आहेत आणि त्यांनी काय उपाय केले पाहिजे.

2/6

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी गुरु चांडाल योग (Guru Rahu Yuti 2023)खूप जास्त कठीण काळ ठरणार आहे. कन्या राशीच्या लोकांना या काळात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. तुमच्यावर कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास यांनी सांगितलं आहे. 

3/6

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठीही गुरु चांडाल योग अनेक अडचणी घेऊन येणार आहे. त्यांना अनेक अशुभ बातम्या मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्याही तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचं मत आहे.   

4/6

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना गुरु चांडाल योगाच्या काळात खूप सर्तक राहण्याची गरज आहे. रस्ते अपघाताची शक्यता आहे. मनं अस्वस्थ राहणार आहे, त्यामुळे तब्येतीवरही परिणाम होणार आहे.

5/6

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाबद्दल तुम्ही काळजीमध्ये असणार आहात. कदाचित कुठल्या तरी प्रकरणात तु्म्हाला कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. 

6/6

संरक्षणासाठी हे उपाय करा (Guru Chandal Yog 2023 ke Upay)

वैदिक ज्योतिषांच्या मते, गुरु चांडाल योग (2023) हा अशुभ असतो. त्यामुळे या काळ ज्योतिषशास्त्रात याचा अशुभ परिणाम टाळण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. दर सोमवारी मंदिरात जाऊन शिवलिंगाचा अभिषेक करावा आणि बेलपत्र अर्पण करावे. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा आणि गायी, श्वानांना भाकरी खायला द्या. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)