भारतातलं असं गाव जिथे घरात होत नाही स्वंयपाक, दोन वेळचं पोट भरण्यासाठी केला जातो जुगाड

Gujarat Village Chandanki : पोट भरण्यासाठी दोन वेळचं जेवण गरजेचं आहे. यासाठी दिवसभर मेहनत करुन घरात दोनवेळचं जेवण बनवलं जातं. पण भारतात असं एक गाव आहे जिथे घरात स्वंयपाकचं केला जात नाही. या गावाची कहाणी फारच मनोरंजक असून सध्या हे गाव चांगलंच चर्चेत आलं आहे. 

| Sep 24, 2024, 20:07 PM IST
1/7

भारतातलं असं गाव जिथे घरात होत नाही स्वंयपाक, दोन वेळचं पोट भरण्यासाठी केला जातो जुगाड

2/7

गुजरातमधलं चांदनकी नावाचं गाव गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय बनलंय. याचं कारण हैराण करणारं आहे. जगभरातील एक्स्पर्ट घरात शिजवलेलं अन्न खाण्याचा सल्ला देतात. पण या गावात मात्र एकाही घरात स्वंयपाक केला जात नाही. याचं कारणही मनोरंजक आहे.

3/7

2011 च्या जनगणेननुसार चांदनकी हे गुजरातमधलं एक छोटसं गाव असून या गावाची लोकसंख्या जवळपास 250 इतकीआहे. यात 117 पुरुष आणि 133 महिला आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार ही संख्या हजारापर्यंत पोहोचली होती. पण आता केवळ 500 नागरिक गावात उरलेत. यापैकी बहुतांशी वृद्ध नागरिक आहेत.

4/7

चांदनकी गावात राहाणारे नागरिकांचं एक वैशिष्ट्य आहे. या गावातल्या कोणत्याही घरात स्वंयपाक केला जात नाही. इथले सर्व लोकांना दोन वेळा एका कम्युनिटी हॉलमध्ये एकत्र जेवण दिलं जातं.

5/7

या कम्युनिटी हॉलमध्ये दोन वेळचं पोटभर जेवण दिलं जातं. यासाठी प्रति व्यक्ती 2000 रुपये महिला जमा केला जातात. याठिकाणी पारंपारिक गुजराती जेवण दिलं जातं. चव आणि दर्जा दोन्ही कडे विशेष लक्ष दिलं जातं.

6/7

चांदनकी गावाचे सरपंच पूनमभाई पटेल यांनी या परंपरेला सुरुवात केली. न्यूयॉर्कमध्ये 20 वर्ष नोकरी केल्यानंतर पटेल आपल्या गावी परतले. तरुण वर्ग नोकरी निमित्ताने शहराकडे निघून गेले. त्यामुळे गावात बहुतांशी वृद्ध नागरिक असून त्यांना दैनंदिन कामकाजासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं त्यांनी पाहिलं.

7/7

त्यातच एकल कुटुंब पद्धती वाढत चालल्याने गावात केवळ वृद्ध राहिले. ही समस्या लक्षात घेऊन पूनमभाई पटेल यांनी चांदनकी गावात सर्वांसाठी एकत्र जेवणाची व्यवस्था सुरु केली. बघता बघता ही परंपराच सुरु झाली. आज देश-विदेशातील अनेक लोकं ही परंपरा पाहण्यासाठी चांदनकी गावाला भेट देतात.