स्पेनमधील गुढीपाडवा सेलिब्रेशनचे Photos पहिलेत का? शिवरायांचा जयघोष, लेझीम, शोभायात्रा अन्...

Gudi Padwa Celebration In Spain: आज भारतामध्ये हिंदू नववर्षाचं जोरदार स्वागत केलं जात आहे. अनेक ठिकाणी गुढ्या उभारुन, शोभायात्रा काढून नवीन वर्षाचा जल्लोष केला जात असतानाच जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी बांधवांकडूनही ते राहत असलेल्या ठिकाणी आपली संस्कृती आणि परंपरा कायम ठेवत हे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जात आहेत. आज आपण पाहणार आहोत यंदाच्या वर्षी स्पेनमधील माद्रिदमध्ये कशाप्रकारे गुढीपाडवा साजरा करण्यात आला याची खास झलक...

| Apr 09, 2024, 11:22 AM IST
1/12

Gudi Padwa Celebration In Spain

स्पेनची राजधानी असलेल्या माद्रिदमध्येही मोठ्या उत्साहात गुडीपाढवा साजरा करण्यात आला.   

2/12

Gudi Padwa Celebration In Spain

यंदा माद्रीदमधील मराठी मंडळाचे पाचवे वर्ष असून त्यानिमित्ताने वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.   

3/12

Gudi Padwa Celebration In Spain

हातात मराठी मंडळाचे फलक घेऊन साड्या नेसून अनेक महिला तसेच पारंपारिक भारतीय पेहरावात पुरुष या शोभायात्रेत सहभागी झाले होते.  

4/12

Gudi Padwa Celebration In Spain

पाडव्याच्या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं स्पेनमध्ये स्थायिक झालेल्या मराठी मांडळींनी हजेरी लावली होती.  

5/12

Gudi Padwa Celebration In Spain

रांगोळ्यांपासून ते भगव्या झेंड्यापर्यंत अगदी मराठमोळा मोहोल या ठिकाणी दिसून आला.   

6/12

Gudi Padwa Celebration In Spain

रांगोळी काढल्यानंतर गुढीची विधीवत पुजा करण्यात आली. महिलांनी पारंपारिक भारतीय साडीचा पेहराव केला होता. 

7/12

Gudi Padwa Celebration In Spain

ढोला ताशांच्या गजरात, छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा नाचवत ही शोभायात्रा काढण्यात आला.  

8/12

Gudi Padwa Celebration In Spain

अनेक महिला आणि पुरुष या शोभायात्रेदरम्यान लेझीम खेळत सहभागी झाले.  

9/12

Gudi Padwa Celebration In Spain

मराठमोळ्या साडी आणि पेहरावामध्ये अगदी गॉगल वगैरे लावून मराठी महिलांनी लेझीमचा आनंद घेततला. तर दुसरीकडे या महिलांना पाहून काही परदेशी माहिलाही लेझीम हातात घेत जल्लोषात सहभागी झाल्या.

10/12

Gudi Padwa Celebration In Spain

अगदी लेझीम खेळण्यापासून डान्सपर्यंत आणि संस्कृती कार्यक्रमांपासून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये परदेशी महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.  

11/12

Gudi Padwa Celebration In Spain

संस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा या संपूर्ण कार्यक्रमात प्राकर्षाने दिसून आला.  

12/12

Gudi Padwa Celebration In Spain

खास मराठमोळ्या मेजवाणीचा बेत यानिमित्त ठेवण्यात आला होता.