सॅमसंग स्मार्ट टीव्ही वापरणाऱ्यांना मोठा झटका!; 1 मार्चपासून 'हे' फिचर कायचमे बंद

तुम्हीही सॅमसंग स्मार्ट टीव्ही वापरत असाल तर तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे. कारण सॅमसंग आपल्या स्मार्ट टीव्हीमधून एक अतिशय उपयुक्त फिचर काढून टाकत आहे.

Feb 04, 2024, 16:46 PM IST
1/7

Samsung has cut ties with Google Assistant

जर तुम्ही सॅमसंग युजर असाल तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते कारण सॅमसंगने गुगल असिस्टंटसोबतचे नाते तोडले आहे.

2/7

Google Assistant Support

सॅमसंग स्मार्ट टीव्हीमध्ये आता गुगल असिस्टंट सपोर्ट दिला जाणार नाही. वृत्तानुसार, 1 मार्च 2024 पासून सॅमसंग स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट काम करणार नाही.

3/7

samsung smart tv model

1 मार्च 2024 पासून, गुगल असिस्टंट यापुढे कोणत्याही सॅमसंग स्मार्ट टीव्ही मॉडेलवर उपलब्ध असणार नाही. हे फिचर सॅमसंगच्या जुन्या स्मार्ट टीव्हीमध्ये देखील काम करणार नाही. सॅमसंगनेही यामागचे कारण सांगितले आहे.

4/7

Samsung TV lineup

सॅमसंगच्या 2023 टीव्ही लाइनअपमधून गुगल असिस्टंट शांतपणे काढून टाकल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सॅमसंग सपोर्ट पेजने देखील पुष्टी केली आहे की हे फिचर सर्व सॅमसंग स्मार्ट टीव्हीवर बंद करण्यात आले आहे.

5/7

samsung tv models

2022 models,2021 models, 2020 8K and 4K QLED TVs, 2020 Crystal UHD TVs, 2020 Lifestyle TVs (Frame, Serif, Terrace, and Sero) या सॅमसंगच्या टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट काम करणार नाही.

6/7

Changes in Google policy

सॅमसंगने 2020 मध्ये त्यांच्या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंटचे फिचर वापण्यास सुरुवात केली. पण केवळ चार वर्षांत, हे फिचर आता सर्व मॉडेलमधून काढून टाकले जात आहे. सॅमसंगचे म्हणणे आहे की गुगलच्या धोरणातील बदलामुळे हे करण्यात आले आहे. तरीही नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

7/7

Amazon Alexa

गुगल असिस्टंट निघून गेल्याने, सॅमसंग टीव्ही ग्राहकांना आता इतर प्री-इंस्टॉल केलेल्या व्हॉईस असिस्टंट्स म्हणजेच सॅमसंगच्या बिक्सबी आणि ॲमेझॉनच्या अलेक्सा वर स्विच करावे लागेल.