Google Pay, Paytm, Phonepe वापरकर्त्यांची अकाऊंट होणार बंद, पाहा काय असेल कारण?

Google Pay, Phone Pay, Paytm च्या वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 31 डिसेंबरपासून त्यांचा UPI आयडी निष्क्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.   

श्वेता चव्हाण | Dec 31, 2023, 14:49 PM IST

rules will change from January 1 : आजकाल अनेक जण GPay, Paytm, PhonePe सारख्या ऑनलाइन पेमेंट अॅप्सद्वारे पेमेंट करतात. तुमच्या फोनमध्ये देखील हे Apps असतीलच.  कॅब बुक करण्यापासून ते ऑनलाईन शॉपिंग पर्यंत, इतकंच काय तर टपरीवरील चहापासून फाईव्ह स्टार हॉटेलचे बिल देण्यापर्यंत अनेकजण ऑनलाइन Payment Apps चा  वापर करत असतात. त्यामुळे आपण रोख रक्कम देखील जास्त जवळ ठेवत नाही. तुम्ही देखील UPI वापरत असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.   

1/6

Google Pay, Phonepe आणि Paytm च्या वापरकर्त्यांना 31 डिसेंबरपासून त्यांचा UPI आयडी निष्क्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे UPI आयडी न वापरल्याने युजरच्या सुरक्षेच्या समस्या वाढू शकतात. 

2/6

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने Google Pay, Paytm आणि Phonepe संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये NPCI ने Google Pay, Phonepe आणि Paytm सारख्या तृतीय पक्ष अॅप्सना UPI प्रदान करण्यास सांगितले आहे. 

3/6

आयडी 31 डिसेंबर 2023 पासून बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, ज्या एका वर्षापासून कार्यरत नाहीत. याचा अर्थ, तुम्ही तुमचे UPI खाते वर्षभर वापरत नसल्यास ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होईल.  

4/6

कोणतं अकाउंट होईल बंद?

तुमच्या युपी आयडीवरून गेल्या असणाऱ्या एका वर्षात जर कोणतेही पैसे तुम्हाला क्रेडिट हे तुमच्या आयडीवरून झाले नसतील तर ही खाती बंद केली जाईल. आणि ही 31 डिसेंबर 2023 पासून ह्या असणाऱ्या आयडी बंद होणार आहे आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना या असणाऱ्या आयडीवरून व्यवहार हा या ठिकाणी करता येणार नाही.  

5/6

NPCI म्हणजे काय?

ही एक ना-नफा संस्था आहे आणि भारताची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहे. म्हणजे PhonePe, Google Pay आणि Paytm सारखी अॅप्स त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांवर काम करतात. तसेच, कोणत्याही वादाच्या बाबतीत, NPCI मध्यस्थ म्हणून काम करते.

6/6

नियम काय?

NPCI परिपत्रकानुसार, 1 वर्षापासून वापरला जाणारा UPI आयडी बंद करण्याचे कारण म्हणजे वापरकर्त्याची सुरक्षा. खरं तर, अनेक वेळा वापरकर्ते त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात, जे फसवणुकीचे कारण बनू शकतात. अशा स्थितीत एनपीसीआयने दिलेली ओळखपत्रे बंद करण्याची माहिती देण्यात आली आहे.