Android युजर्ससाठी आनंदाची बातमी! Google आणतंय नवे दमदार फीचर्स

Android स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी गूगल काही नवीन फिचर्स घेऊन आलं आहे. हे फिचर्स वापरकर्त्यांच्या रोजची काही कामं सोपी करण्यासाठी बनवण्यात आले आहेत. हे फीचर युजरला वेगवेगळ्या सुविधा देतील. चला याविषयी डिटेलमध्ये जाणून घेऊया...

| May 31, 2024, 17:52 PM IST
1/7

एका टॅपमध्ये कनेक्ट

लवकरच तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या हॉटस्पॉटला तुमच्या टॅबलेट किंवा क्रोमबूकशी फक्त एका टॅपनं कनेक्ट करु शकाल

2/7

गूगल आता एक नवीन इमोजी मिक्स करण्याचं फीचर घेऊन येणार आहे. तुम्ही तुमचे आवडीचे इमोजी मिळून म्हणजेच डिस्को बॉल आणि हेडफोन लावून नवीन स्टिकर लावू शकतात आणि त्याला तुमच्या मित्रांसोबत शेअर करु शकतात. 

3/7

त्याशिवाय Google Meet कॉल दरम्यान, कास्ट आयकॉनच्या मदतीनं दुसऱ्या डिव्हाइसवर स्विच करू शकाल. उदाहरण द्यायचं झालं तर कॉल सुरु असताना मध्येच तुम्हाला डिव्हाइस बदलायचं असेल तर तुम्ही कास्ट आयकॉनवर क्लिक करून दुसऱ्या फोनवर जाऊ शकता. त्यानं तुम्ही टॅबलेट आणि वेब ब्राउजरवर कॉल ट्रान्सफर करू शकता.   

4/7

Google Home Favourites

तुमच्या घरातील सगळ्या स्मार्ट डिव्हाइसला सोप्या पद्धतीनं कंट्रोल करू शकतात. त्यासाठी तुम्हाला Google Home Favourites विजेटला तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर ठेऊ शकतात. फीचर पब्लिक प्रिव्यूचा ऑप्शन देखील आहे. 

5/7

Wear OS वापरणाऱ्यांसाठी नवा ऑप्शन

Wear OS चे स्मार्टवॉच वापरकर्त्यांसाठी Google Home Favourites टाइलच्या मदतीनं त्यांच्या स्मार्ट होम डिवाइसला कंट्रोल करू शकता.  

6/7

घराचा दरवाजा ते लाइट एका क्लिकवर

घराचा दरवाजा उघडू शकता, लाइट कमी करू शकता किंवा एसीचं टेम्परेचर कमी जास्त करु शकता. 

7/7

काही गाड्यांनाही वापरता येईल

काही गाड्या तुम्ही डिजिटल करु शकतात. सध्या काही खास MINI मॉडेल गाड्यांमध्ये हा फीचर सुरु केला आहे. लवकरच Mercedes-Benz आणि Polestar गाण्यांमध्ये याचा वापर करण्यात येईल. या फीचरनं तुम्ही फोनच्या मदतीनं गाडीचा लॉक- अनलॉक करु शकतात. गाडी सुरु करु शकतात आणि त्यासोबत कुटुंब आणि मित्रांसोबत गाडीची डिजिटल चावी शेअर करु शकतात.