चार्जरमध्ये स्पीकर, 12 तासांचा बॅटरी बॅकअप आणि... गुगलचा पहिला पिक्सेल टॅब्लेट लॉन्च

Google Pixel Tablet : गुगलने आपला पहिला टॅबलेट लाँच केला आहे. यामध्ये कंपनीने दमदार फीचर्स दिले आहेत.  माउंटन व्ह्यू कॅलिफोर्निया शोरलाइन अॅम्फीथिएटर येथे हा टॅब्लेट लॉन्च करण्यात आला आहे. गुगल पिक्सेल टॅब्लेटला मागील बाजूस अल्ट्रा वाइड तर सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.

May 11, 2023, 18:58 PM IST
1/6

google event

Google I/O 2023 इव्हेंटमध्ये गुगलने आपली अनेक उत्पादने ग्राहकांसाठी बाजारात आणली आहे. या इव्हेंटमध्ये गुगलने पिक्सेल फोल्ड या स्मार्टफोनसह Pixel Tablet देखील लॉन्च केला आहे.  Pixel Tablet हा गुगलचा पहिला टॅब्लेटट आहे.

2/6

Google Pixel Tablet Specifications

गुगलने यामध्ये अनेक फीचर्स दिले आहेत. मोठा डिस्प्ले, Tensor G2 प्रोसेसर यासह अनेक वैशिष्टे या टॅबमध्ये आहेत. या टॅबसोबत तुम्हाला मल्टी पर्पज मॅग्नेटिक स्पीकर डॉक देखील मिळणार आहे. याचा उपयोग तुम्ही चार्जिंगसह स्पीकर म्हणूनही वापर करु शकता.

3/6

Google Pixel Tablet price

Google Pixel टॅब्लेटची किंमत 499 डॉलर आहे. भारतीय किंमतीनुसार, 40,000 रुपयांमध्ये हा टॅब मिळणार आहे. अमेरिका, कॅनडा, यूके, जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, नेदरलँड, जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये 20 जूनपासून हा टॅब मिळणार आहे. मात्र भारतात हा टॅब विकला जाणार नाही.

4/6

Google Pixel Tablet display

या टॅबमध्ये 11 इंचाची एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. टॅबच्या डिस्प्लेला टच सपोर्ट आहे आणि यासोबत स्टाईलस देखील देण्यात आला आहे. पिक्सेल टॅब्लेटचा डिस्प्ले 2560x1600 (फुल-एचडी+) रिझोल्यूशन आणि स्टॅंडर्ड 60Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. 

5/6

google tab camera

या टॅब्लेटमध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच Tensor G2 SoC आणि 27Wh बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे हा टॅब्लेट 12 तासांपर्यंत चालू शकतो

6/6

google tab Android 13

Android 13 वर गुगलचा हा टॅब्लेट काम करतो. डेटा ट्रान्सफरसाठी Nearby Share चा पर्याय देण्यात आला आहे. या टॅबसोबतच तुम्हाला क्वाड स्पीकर सिस्टीम, तीन मायक्रोफोन, यूएसबी-सी चार्जिंग पोर्ट, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर इत्यादी गोष्टी सोबत मिळणार आहेत.