कॅन्सर रुग्णांसाठी आनंदाची बातमी, ACTREC खारघरमध्ये प्रोटोन बीम थेरेपीला सुरुवात

Good news for Cancer Patients:अमेरिकेत प्रोटॉन थेरपीच्या उपचारांचा खर्च 1 कोटी ते 1.5 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. असे असताना ACTREC खारघर येथे सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध होतील, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्ण मोफत उपचार घेऊ शकतील, अशी माहिती टीएमसीचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली. 

| Aug 17, 2023, 18:19 PM IST

Proton Beam Therapy:15 ऑगस्टचे औचित्य साधून येथे कॅन्सर रुग्णांवरील उपचाराला सुरुवात करण्यात आली. यातील पहिला रुग्ण 60 वर्षाचा असून तो  कार्डोमा ऑफ द सॅक्रम ऑफ बोर्नने ग्रस्त आहे. तर दुसरा रुग्ण 35 वर्षांचा असून त्याला इविंग सारकोमा ऑफ बॉर्नने ग्रस्त आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबईचे आहेत. 

1/8

कॅन्सर रुग्णांसाठी आनंदाची बातमी, ACTREC खारघरमध्ये प्रोटोन बीम थेरेपीला सुरुवात

Good news for cancer patients ACTREC starts proton beam therapy at Kharghar

कर्करोगाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मेमोरियल सेंटर (TMC) च्या ACTREC खारघर केंद्रात प्रोटॉन थेरपीने उपचाराला सुरुवात झाली आहे. येथे कॅन्सर रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मोफत उपचार मिळू शकतील.   

2/8

कॅन्सर रुग्णांवरील उपचाराला सुरुवात

Good news for cancer patients ACTREC starts proton beam therapy at Kharghar

15 ऑगस्टचे औचित्य साधून येथे कॅन्सर रुग्णांवरील उपचाराला सुरुवात करण्यात आली. यातील पहिला रुग्ण 60 वर्षाचा असून तो  कार्डोमा ऑफ द सॅक्रम ऑफ बोर्नने ग्रस्त आहे. तर दुसरा रुग्ण 35 वर्षांचा असून त्याला इविंग सारकोमा ऑफ बॉर्नने ग्रस्त आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबईचे आहेत. 

3/8

आठवड्याचे सातही दिवस उपचार

Good news for cancer patients ACTREC starts proton beam therapy at Kharghar

दोन्ही रुग्णांचा अ‍ॅडव्हान्स स्टेज ट्यूमर होता..यांची सर्जरी होऊ शकत नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर प्रोटॉन थेरेपी केली जात आहे. आठवड्याचे सातही दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. दोन्ही रुग्णांवर मोफत उपचार केले जात असून त्यांच्या निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

4/8

दुर्बल घटकातील रुग्णांवर मोफत उपचार

Good news for cancer patients ACTREC starts proton beam therapy at Kharghar

अमेरिकेत प्रोटॉन थेरपीच्या उपचारांचा खर्च 1 कोटी ते 1.5 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. असे असताना ACTREC खारघर येथे सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध होतील, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्ण मोफत उपचार घेऊ शकतील, अशी माहिती टीएमसीचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली. 

5/8

रुग्णांसाठी सर्वोत्तम आरोग्य सेवा

Good news for cancer patients ACTREC starts proton beam therapy at Kharghar

ACTREC आणि IBA या दोन्ही टीम मिळून भारतातील रुग्णांसाठी सर्वोत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्यात यशस्वी ठरत असल्याचे ACTREC चे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. 

6/8

रुग्णांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज

Good news for cancer patients ACTREC starts proton beam therapy at Kharghar

प्रोटोन थेरीप सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे टीएमसीचे उपसंचालक डॉ. सिद्धार्थ लष्कर यांनी सांगितले. 

7/8

IBA साठी मैलाचा दगड

Good news for cancer patients ACTREC starts proton beam therapy at Kharghar

हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे आणि TMC आणि Ion Beam Applications (IBA) साठी हा एक मैलाचा दगड आहे. IBA ही बेल्जियम-आधारित कंपनी असून प्रोटॉन थेरपी आणि प्रवेगक प्रणालींमध्ये जागतिक आघाडीवर आहे. 

8/8

रुग्णांवर सर्वोत्तम प्रोटॉन उपचार

Good news for cancer patients ACTREC starts proton beam therapy at Kharghar

आयबीए आपल्या देशातील रुग्णांना सर्वोत्तम प्रोटॉन उपचार अनुभव देण्यास आणि टीएमसीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास वचनबद्ध असल्याचे आयबीए इंडियाचे संचालक राकेश पाठक यांनी सांगितले.