पासपोर्टला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नाही

Passport in Marathi : एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट. पासपोर्ट काढण्यासाठी आपली योग्य कागदपत्र सादर करावी लागतात. ओळखीचा पुरावा म्हणूनही पासपोर्टचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे पासपोर्टला मराठीत काय म्हणतात?

| Sep 13, 2024, 18:31 PM IST
1/6

पासपोर्टला मराठी काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नाही

2/6

शातून परदेशात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट.  पासपोर्टशिवाय आपण देशाबाहेर जाऊ शकत नाही. ओळखीचा पुरावा म्हणूनही पासपोर्टचा वापर केला जातो. पासपोर्टमध्ये आपल्या फोटोसहित आपली वैयक्तिक माहितीही लिहिलेली असते. म्हणजे आपली जन्मतारीख, राहाण्याचा पत्ता इत्यादी...

3/6

सध्याच्या काळात प्रत्येकाकडे पासपोर्ट असणं महत्त्वाचं मानलं जातं. भारतामध्ये तीन प्रकारचे पासपोर्ट दिले जातात. यात पर्सनल पासपोर्ट,  डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि ऑफिशियल पासपोर्ट यांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहित आहे पासपोर्टला मराठीत काय म्हणतात. 

4/6

पासपोर्टला हिंदी भाषेत  अभय पत्र, अनुमती पत्र, राहदारी, गमनपत्र, आज्ञापात्र इत्यादी शब्द वापरले जातात. तर मराठीत पासपोर्टला पारपत्र असं म्हटलं जातं. याचा अर्थ कोणतीही वस्तू बाहेर पाठवण्यासाठी वापरण्यात आलेले पत्र.

5/6

जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्ट जपानचा आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूरचा पासपोर्ट येतो. जर्मनी आणि दक्षिण कोरियाया संयुक्तरित्या तिसरा क्रमांका लागतो. श्क्तीशाली पासपोर्टच्या यादीत भारतीय पासपोर्टचा नव्वदावा क्रमांक लागतो.

6/6

डिजिटायझेशनमुळे जवळपास सर्व KYC कागदपत्रांच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्ती उपलब्ध झाल्या आहेत. पासपोर्टही याला अपवाद नाही. भारतीय नागरिक अधिक सुरक्षित फीचर्ससह आपला इ-पासपोर्ट काढू शकतात. इ-पासपोर्ट असलेल्या प्रवाशांना जास्त वेळ रांगेत उभे राहण्याची गरज नाही कारण हा पासपोर्ट काही सेकंदात स्कॅन करता येतो.