गौतम अदानींना किती पगारवाढ झाली माहित आहे का? पगार कोण देत आणि किती पगार द्यायचा हे कोण ठरवतं?

गौतम अदानी यांच्या पगाराचे वार्षिक पॅकेज किती आहे जाणून घेऊया. 

| Jun 23, 2024, 21:37 PM IST

Gautam Adani Salary : रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यांच्यानंतर अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पगाराच्या बाबतीतही अदानी हे उद्योगातील इतर दिग्गजांपेक्षा कमी नाहीत जाणून घेऊया गौतम अदानी यांना किती पगार मिळतो. नवनि वर्षात त्यांना किती पारवाढ झाली.

1/10

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना 2023-24 या आर्थिक वर्षात जे वेतन मिळाले ते इतर बड्या कंपन्याच्या प्रमुखांच्या तुलेत फारच कमी आहे.   

2/10

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 9.26 कोटी रुपये इतका पगार मिळाला. 

3/10

अदानी पोर्ट्सने 2 मे रोजी आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे उत्पन्न जाहीर केले आहे.  अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने 2023-24 या आर्थिक वर्षात 3,240.78 इतका नफा कमावला.  

4/10

कंपनीत 1900 हून अधिक कर्मचारी काम करतात. अदानी लॉजिस्टिक लिमिटेड ही अदानी पोर्ट्सची उपकंपनी आहे.  

5/10

गौतन अदानी यांचा मुलगा करण अदानी हा कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अश्वनी गुप्ता आहे.  

6/10

 गौतम अदानी हे अदानी पोर्ट्सचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांनी 1998 मध्ये ही कंपनी स्थापन केली. 

7/10

 रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​मालक मुकेश अंबानी  हे ब्लूमबर्गच्या यादीत 12 व्या नंबरवर आहेत. अंबानींची एकूण संपत्ती ₹9,27,549 कोटी आहे.

8/10

गौतम अदानी यांची वैयक्तिक संपत्ती 8,85,767 कोटी रुपये आहे.

9/10

 ब्लूमबर्गच्या रियलटाइम बिलियनेअर इंडेक्सनुसार जगातील  श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी यांचे नाव हे 14 व्या स्थानी आहे.

10/10

सुनील भारती मित्तल (₹16.7 कोटी 2022-23), राजीव बजाज (₹53.7 कोटी), पवन मुंजाल (₹80 कोटी), L&T चे अध्यक्ष SN सुब्रमण्यम आणि इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सलील एस. पारेख यांच्या तुलनेत गौतम अदानी यांना मिळणारे वेतन काहीच नाही.